यावेळी पिरॅमल नीति आयोग तालुका परिवर्तन अधिकारी साईनाथ अरगडे यांनी गरोदर व स्तनदा माता, तसेच अंगणवाडीसेविका यांना आहार, आरोग्य व बाळासाठी पहिल्या एक हजार दिवसांचे महत्त्व, वरचा आहार, कुपोषण नष्ट करण्यासाठी पालकांबरोबर गावातील नागरिकांचा सहभाग या विषयी मार्गदर्शन केले, तसेच वडाळी बिटच्या पर्यवेक्षिका जे.बी. चौधरी, सी.बी.ब्राह्मणे यांनी गरोदर मातेला सकस आहारविषयक, तसेच स्वच्छतेविषयी आणि गावातील प्रत्येक घराशेजारी व अंगणवाडी शेजारी परसबाग असली पाहिजे, असे सांगितले.
यावेळी सामाजिक संदेश देणारी रांगोळी, आहार प्रात्यक्षिके, जनजागृती रॅली व पोषण आहाराची शपथ हे सर्व कार्यक्रम सोशल डिस्टन्सचे पालन करून घेण्यात आले. यावेळी वडाळी एक व दोन बीटच्या सेविका उपस्थित होत्या.