शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रीप्रकरणात अल्पवयीन मुलींची संख्या वाढली

By admin | Updated: January 17, 2017 23:59 IST

न्यायालयीन कोठडीचे आदेश : तीन महिलांवर गुन्हा दाखल

शहादा : शहरातील नव्या भाजीपाला मार्केटलगत छुप्या पद्धतीने देहविक्री करणा:या 68 महिलांना शहादा पोलिसांनी ताब्यात घेतले होत़े यात सात युवती ह्या अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले होत़े ही संख्या वाढली असून वैद्यकीय तपासणीअंती तीन युवती अल्पवयीन असल्याचे समोर आले आह़े या प्रकरणी तीन महिलांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता़ यातील संशयित आरोपी असलेल्या महिलांना पोलिसांनी गेल्या आठवडय़ात शहादा येथे अटक केली होती़ तर उर्वरित एका महिलेला दोन दिवसांपूर्वी गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आह़े तीन महिलांना 27 जानेवारीर्पयत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आह़े यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन युवतींना नंदुरबार बालविकास समितीच्या ताब्यात देण्यात आले होत़े तर आता पुन्हा नव्याने निष्पन्न झालेल्या तीन अल्पवयीन मुलींनाही या समितीकडे सोपवण्यात आले आह़े या सर्व युवतींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आह़े कारवाई करण्यात आलेल्या 68 महिला व युवतींपैकी 58 महिला सध्या जयनगर येथील सुधारगृहात आहेत़ यातील 16 महिलांना बोरीवली तर 16 महिलांना कांदिवली येथे महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आह़े उर्वरित 26 महिलांना जयनगर आणि पुणे येथे सुधारगृहाकडे रवाना करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आह़े जयनगर येथे सध्या दाखल करण्यात आलेल्या महिलांची चौकशी पोलीस करत आहेत़  या प्रकरणाचा तपास शहादा पोलीस करत आहेत़ शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी लतीफ तडवी, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधंवत, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, नीलिमा सातव, ज्ञानेश्वर बडगुजर, अंकुश बोराटे यांच्यासह पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी गेल्या आठवडय़ात ही कारवाई केली होती़  (वार्ताहर)अल्पवयीन युवतींची संख्या वाढणार 4शहाद्यात झालेल्या या कारवाईनंतर भाजीपाला मार्केटलगत गेल्या आठवडाभरापासून शुकशुकाट आह़े याठिकाणी सामसूम असल्याने परिसातील अनेक अवैध धंदे आपसूक बंद झाले आहेत़ 4मुंबई येथील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेतर्फे ही कारवाई करण्यात आली होती़ या कारवाई फाउंडेशनच्या शायनी पडियार यांनी सहभाग घेत पोलीस अधिका:यांना माहिती दिली होती़ याबाबत शायनी पडियार यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी अद्याप अनेकींची वैद्यकीय तपासणी बाकी आह़े त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन युवतींची संख्या वाढणार असल्याची माहिती दिली आह़े 4देहविक्रीला प्रवृत्त करणा:या तीन महिलासोबत आणखीन कोणाचा सहभाग आहे, किंवा कसे, याचा तपास शहादा पोलीस ठाण्याच्या अधिका:यांकडून करण्यात येत आह़े