शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:01 IST

पाच वर्षाचा वाढता आलेख : धकाधकीच्या जीवनशैलीत काळजी घेणे गरजेचे

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : नंदुरबार जिल्ह्यात सध्या मानसिक आरोग्याची समस्या भेडसावू लागली आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाचा आलेख पाहिला असता मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांची संख्या वाढत जात आहेत़ मार्च 2018 र्पयतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात  3 हजार 991 मनोरुग्णांची संख्या असल्याचे समजत़े रोजचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येणाचा संभव असतो़ याचाच परिणाम म्हणून की काय जिल्ह्यात मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आह़े ‘लोकमत’तर्फे 2013 पासून जिल्ह्यातील मनोरुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला़ मनोरुग्णांची संख्या मोजण्यासाठी साधारणत 4 विभाग करण्यात येत असतात़ आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नवीन रुग्ण व आधीपासून उपचार घेत असलेले रुग्ण अशी विभागणी करण्यात येत असत़े त्यानुसार 2013 मध्ये 212 रुग्ण, 2014 मध्ये 423 रुग्ण, 2015 मध्ये 1 हजार 660 रुग्ण, 2016 मध्ये 2 हजार 637, 2017 मध्ये 2 हजार 588 तर 2018 मध्ये मार्च महिन्यार्पयत तब्बल 3 हजार 991 रुग्णांची नोंद नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आह़े दिवसेंदिवस जिल्ह्यात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाटावी अशी आकडेवारी समोर येत आह़े त्यामुळे नागरिकांनी ताण-तणावमुक्त जीवनशैली ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े मानसिक तणावामुळे अनेक वेळा रुग्ण आत्महत्यासारखे पर्याय निवडत असतो़ त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णातील मानसिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात शिबीरे घेऊन दुर्गम भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आह़े त्याचा फायदा म्हणून आंतररुग्ण विभागाच्या तुलनेत बाह्यरुग्ण विभागात मोठय़ा संख्येने रुग्णांची नोंद करण्यात येत असत़े  अनेक नागरिकांना मानसिक आजारांची लक्षणे असूनही त्यांना याबाबत समजून येत नसत़े छिन्नमनस्कता, उदासिनता, अतिउत्साह, चिंतेचे विकार, व्यसनाधिनता, मिरगीचा आजार, स्मृतिभं्रश, झोपेचे विकार आदी मानसिक आजारांची लक्षणे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असतात़ त्यामुळे अशा स्थितीत मानसिक आजार असूनही काही वेळा रुग्ण सामान्य जीवन जगत असतो़ परंतु कालांतराने त्याच्या वागण्यात मोठय़ा प्रमाणात बदल घडून येत असतात़ व हळुहळु लक्षणांमध्ये वाढ होत असत़े जीवनशैलीत बदल करावेअनेक वेळा मानसिक आजाराला कारण ठराविक जीवशैलीदेखील ठरत असत़े कुणाशी न बोलणे, एकांतात राहणे पसंत करणे, इच्छा असूनही एखादी गोष्ट करण्यास कंटाळा करणे आदी जीवनशैलीमुळे मानसिक आजार जडण्याची शक्यता असत़े त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास येऊ घातलेल्या मानसिक आजाराला दूर सारता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े आदिवासी जिल्हा असल्याने दुर्गम भागात अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण आढळून येत असतात़ त्यामुळे दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात मानसिक आरोग्य सेवेला अत्यंत महत्व निर्माण झाले आहेत़ मानसिक आरोग्य स्वस्त रहावे यासाठी शासनाकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असत़े