लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा मुकाबल करून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. यात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी वाढत असल्याने डोज वाया जाण्याची भीती आहे. परंतु येणारे कर्मचारी तेवढ्याच व्हायल अर्थात कुप्या फोडल्या जात असल्याने डोज वाया जाण्याची टक्केवारी जिल्ह्यात नगण्य आहे. जिल्ह्यात दर दिवशी किमान ४०० जणांना लस देण्याचे आरोग्य विभागाने निर्धारित केले होते. यासाठी एकूण १२ हजार लाभार्थींच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. नोंदणी झालेल्या या लाभार्थींना निरोप दिल्यानंतरही सध्या ते येत नसल्याचे चित्र आहे. यातून पहिल्या दिवशी ६५ टक्के तर दुसऱ्या दिवशी ७५ टक्के लसीकरण जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे. येत्या काळात आरोग्य विभागाचे अधिकाधिक कर्मचारी लसीकरण करतील असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वतोपरी सुरक्षित अशा लसीमुळे धोका कमी
- केंद्र शासनाने आणलेल्या लसीमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लस सुरक्षित अशी आहे. कर्मचा-यांना होणारी घबराट ही भितीतून आहे. काही ठिकाणी चक्कर येणे, मळमळ, ताप येणे हे प्रकार झाले असले तरी काही काळानंतर सर्वकाही ठिक झाले आहे. कर्मचा-यांनी घाबरुन न जातात लसीकरणासाठी यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी.बोडके यांनी केले.
- दरम्यान आरोग्य विभागाने नाेंदणी केलेल्या १२ हजार कर्मचा-यांपैकी काहींना जुनाट आजार, रक्तदाब, मधुमेह, हायपर टेन्शनचा त्रास असल्याचे समोर आल्याने त्यांना लसीकरणापासून लांब ठेवले गेले आहे. आरोग्य विभागाने स्तनदा माता असलेल्या परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांनाही या लसीकरणास मनाई केली आहे.
जिल्ह्याला १२,४२० डोस मिळालेदोन दिवसातील लसीकरणात एकही डोस वाया गेलेला नसल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे. २६५ जणांना पहिल्या दिवशी डोस दिले १३५ जण पहिल्या दिवशी गैरहजर