शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुर ओसरल्यानंतर आता आरोग्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचाही प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी साथींचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचाही प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी साथींचा रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे. सरकारी बरोबरच खाजगी दवाखाने अशा रुग्णांनी हाऊस फूल होत असल्याचे चित्र आहे. संबंधीत आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गेल्या 15 दिवसांपासून शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरात सर्वच भागात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले आहेत. परिणामी डासांचीदेखील मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती वाढली आहे. डासांच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, टाईफाईड, थंडी, ताप, खोकला, अशा साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. उपचारासाठी रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होत असल्यामुळे दवाखानेही हाऊस फुल्ल झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना बसायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: दवाखान्याबाहेर रांगेत, ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच 15 दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे घरोघरी ताप, थंडी, खोकला, सर्दीचे रुग्ण असल्याचे म्हटले जात आहे. दवाखान्यात डॉक्टरांकडून एकदा उपचार घेऊन तात्पुरता दोन दिवस बरे झाल्यानंतर पुन्हा सर्दी, ताप, खोकल्याची               लागन होत असल्यामुळे शहरवासीय अक्षरश: वैतागले आहेत. साथीच्या वाढत्या रोगांमुळे कुटुंबांना             आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.वास्तविक शहरात मोठय़ा प्रमाणात थंडी, ताप, सर्दीची साथ पसरत असतांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग व शासनाच्या आरोग्य विभागाने साफ दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या दोन्ही यंत्रणांनी घरोघरी जावून अशा रुग्णांची रक्त तपासणी, औषधोपचार करण्याची अपेक्षा आहे. शहरात शासनाचे मोठे उपजिल्हा रुग्णालय असले तरी तेथे  वैद्यकीय अधिका:यांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरील खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असून, यात आर्थिक फटका बसत असल्याची व्यथा काही नातेवाईकांनी बोलून दाखविली. संबंधीत यंत्रणांच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करण्याबाबत संबंधीतांना  सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी आहे.

शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरपालिकेने गेल्या दोन वर्षापूर्वी दोन-अडीच लाखांचे धुरळणी यंत्र खरेदी केले आहे. मात्र त्याचा वापर होण्या ऐवजी ते अक्षरश: धुळखात पडल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक शहरात बहुतेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ-मोठे डबके साचले आहेत. पालिका हद्दीतील सर्वच नवीन वसाहतींमध्ये तर गटारी व पक्के रस्त्यांअभावी अक्षरश: तलावच भरले आहेत. त्यामुळे तेथे दरुगधी पसरली आहेच. परंतु डासांची उत्पत्तीदेखील वाढली आहे. या पाश्र्वभूमिवर पालिकेकडून धुरळणीची मोहीम राबविणे गरजेचे आ9ह. मात्र या कडे खुद्द पालिकेच्या प्रशासनाबरोबर पदाधिका:यांनीही साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.