लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : प्रबोधिनी एकादशीनिमित्त घरोघरी तुळशी विवाह उत्साहात पार पडला़ शुक्रवारी सायंकाळी यानिमित्त ठिकठिकाणी पारंपरिक देवपूजन करण्यात आल़े शुक्रवारी पार पडलेल्या या एकादशीनंतर येत्या 12 नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्यांचे मुहूर्त ठरवणे शक्य होणार असल्याने लगAसराईलाही सुरुवात होणार आह़े 12 नोव्हेंबर ते जून 2020 या कालावधीत तब्बल 46 मुहूर्त निघणार असल्याने विवाहेच्छुकांच्या पालकांची चिंता मिटणार आह़े तुळशी विवाहाच्या नऊ दिवसानंतर सुरु होणा:या विवाह मूहूर्तामुळे अनेकांचे मार्ग मोकळे होणार आहेत़ नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात 11 मूहूर्त असल्याने अनेक पालकांची काळजी दूर झाली आह़े गेल्यावर्षी विवाहसोहळ्यांसाठी 86 मुहूर्त होत़े परंतू यंदा 46 मुहूर्त असल्याने पालकांची अडचणी वाढणार असल्याचेही सांगण्यात आले असून यातून मंगल कार्यालये आणि इतर साहित्याची जुळवाजुळव करण्यात धावपळ वाढणार असल्याचे बोलले जात आह़े विवाह सोहळे सुरु होणार असल्याने पूरक उद्योग करणा:यांचीही लगबग सुरु झाली आह़े दरम्यान अद्यापही पाऊस वेळावेळी हजेरी लावत असल्याने गेल्यावर्षापासून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात नियोजन करुन ठेवलेल्या पालकांना काहीशी चिंता सतावत आह़े याबाबत तोरखेडा येथील पुरोहित सुनील खुंटे यांनी सांगितले की, नोव्हेंबर ते जून 2020 र्पयतचा काळ हा विवाहसोहळ्यांसाठी शुभ ठरणार आह़े गुरुच्या अस्तामुळे मुहूर्त काहीसे कमी होणार असले तरीही त्याच्या जवळपासचा कालावधी हा योग्य असल्याने विवाहसोहळे पार पडू शकतील़
20 नोव्हेंबर ते जून 2020 र्पयत 46 विवाह मुहूर्तातून वाजणार सनई चौघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:43 IST