शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरडी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:05 IST

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पासाठी चार गावांच्या ७९ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे़ ...

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पासाठी चार गावांच्या ७९ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे़ अधिग्रहण प्रस्तावावर एकही हरकत न आल्याने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी ही अधिसूचना काढली आहे़नवापुर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालवा क्रमांक चार साठी जमीन संपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे संबधित यंत्रणेने दिला होता़ मळवाण, मेंदीपाडा, सागाळी, श्रावणी या चार गावांमध्ये १५ हेक्टर ८११ आर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते़ यासाठी जानेवारी २०१८ मध्ये अधिसूचना काढण्यात आली होती़ दरम्यानच्या काळात यावर कोणीही हरकत घेतली नाही़ यामुळे प्रशासनाने या जमिनींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव तयार करत अधिसूचना काढली आहे़ चारही गावातील ७९ शेतकऱ्यांच्या या जमिनी असून त्यांना जमीन अधिनियम २०१३ च्या तरतूदीनुसार मोबदला देण्याच्या कामांना वेग आला आहे़ येत्या काळात शेतकºयांच्या जमिनींचे भूसंपादन पूर्ण होणार आहे़जिल्हाधिकारी यांनी नवापुर तालुक्यासोबतच नंदुरबार तालुक्यात चौपाळे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील एस्केप चॅनलला हिरवी झेंडी दिली आहे़ यानुसार एकूण चार शेतकºयांचे ३५ गुंठे क्षेत्र अधिग्रहीत करण्याची अधिसूचना काढली गेली आहे़ शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभ क्षेत्रातील शेतकºयांच्या आर्थिक स्थितीत आर्थिक सुधारणा होण्याच्या हेतूने जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हाधिकाºयांनी दोन्ही कालव्याचा प्रश्न मार्गी लावल्याने नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे़