शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व सास्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना नोटीस बजावली आहे. संस्थाचालकांच्या फूसवरूनच शिक्षकांना शाळेत जावून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतरच या घटनेची वाच्यता झाली होती.शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची शिक्षण विभागाने दखल घेतली असून आतातरी पोलिसात गुन्हा दाखल केला जातो की नाही याबाबत शिक्षण संस्था चालकांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांनी २१ फेब्रुवारी रोजी संस्थेला आणि मुख्याध्यापकांना याबाबत बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आवडामाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धमडाई संचलित माध्यमिक विद्यालय पथराई येथे शिक्षकांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण प्रकरणी शिक्षकांची कोणत्याही प्रकारची चूक नसून एका सूड भावनेने हा प्रकार घडून आल्याचे स्पष्ट होते.ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमोर ही घटना घडली. मुख्याध्यापकांनी घटना निदर्शनास आल्यानंतर मध्यस्थी का केली नाही. झालेला वाद हा मिटविला का नाही? याबाबत पोलिसात कुठलीही तक्रार का दिली गेली नाही? या बाबी संसयास्पद आहेत.झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून याबाबत जिल्ह्यात व जिल्हाबाहेर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार शिक्षणासारख्या पवीत्र क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. संस्थेने याबाबत कोणती कारवाई केली हे स्पष्ट करावे. या गंभीर घटनेला संस्थाचालक दोषी ठरवून शाळेची मान्यता का काढण्यात येवू नये आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.संस्थेवर प्रशासक बसविण्याबाबत शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडे शिफारस करून प्रस्ताव का सादर करण्यात येवू नये याबाबत तातडीने खुलासा करावा. समक्ष कार्यालयात येवून याबाबत स्पष्टीकरण द्यावे असेही या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.शिक्षणाधिकारी यांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी संस्थेला व संबधितांना कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.४एवढी मोठी घटना घडून, त्यात चार शिक्षक जखमी होऊन देखील शाळा किंवा संस्थेतर्फे कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही, पोलिसांकडे साधा तक्रारी अर्जही दिला गेला नाही.४गुंड प्रवृत्तीचा जमाव शाळेत येतो, विद्यार्थी, शिक्षकांसमोर ठराविक शिक्षकांनाच मारहाण करतो, विद्यार्थीनी शिक्षकांची बाजू घेत असतांनाही मुख्याध्यापक किंवा अन्य कुणी मध्यस्थी करीत नाही या सर्वच गोष्टी संशायस्पद आहेत. घटना घडवून आणण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.