शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाणगी गैरहजर राहणा:या अधिका:यांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 12:34 IST

जि.प.स्थायी समिती सभा : अधिकारीच नसल्याने बैठक घेतली आवरती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाच अधिकारी परवाणगी न घेता सभेस उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत ठरविण्यात आले. दरम्यान, सभेत शिक्षण व आरोग्य या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद स्थायी समिती सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या. उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन यांच्यासह सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. सभेस अनेक प्रमुख अधिका:यांची अनुपस्थिती असल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पाच अधिकारी हे शासकीय कामांसाठी बाहेरगावी गेले आहेत. परंतु सभेस अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी अध्यक्षांची परवाणगी घेतलेली नव्हती. केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवाडे हे पुणे येथे बैठकीसाठी गेले आहेत. तशी माहिती सभागृहाला होती तर पशुसंवर्धन अधिकारी यांचा रजेचा अर्ज होता. याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी अरुण पाटील हे पुणे येथे बैठकीसाठी. मुख्य लेखा व वित्त अधिकारी लिंगनवाड हे न्यायालयीन कामकाजासाठी, डीआरडीएचे जालिंदर पठारे बैठकीसाठी तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे मुंबई येथे बैठकीसाठी गेले आहेत. त्याबाबत अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला असता बी.एम.मोहन यांनी सांगितले, अध्यक्षांना पूर्व कल्पना न देता किंवा परवाणगी न घेता सभेला गैरहजर राहता येत नाही. त्यामुळे त्यांना नोटीसा देवून खुलासा मागविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी रोषमाळखुर्द केंद्राअंतर्गत काही शाळांना भेटी दिल्या होत्या. त्यातील 17 शाळांवर शिक्षक जात नसल्याचे उघड झाले. मांडय़ापाडा शाळेत एप्रिल महिन्यापासून मुख्याध्यापक  जात नाहीत. कागदपत्रे देखील घेवून गेले आहेत. चौथी पास झालेल्या विद्याथ्र्याना दाखले दिले नाहीत. त्यांचा पगार जूनर्पयत काढण्यात आलेला आहे हे विशेष असल्याचे नाईक यांनी सांगितले. या भागात दोन शिक्षक हे शाळांवर आठवडय़ाच्या डय़ुटय़ा लावलेल्या आहेत. त्यामुळे शाळा एक शिक्षकीच असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिक्षकांसोबतच संबधित अधिका:यांवरही कारवाई करावी व खुलासे मागवावे अशा सुचना त्यांनी केल्या. विशेष कृती आराखडय़ातील अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या सुचना अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिल्या. 662 पैकी 231 कामे अपुर्ण असून त्यात अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्रांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.