लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्यावर्षातील अतीवृष्टी, अवकाळी पाऊस आणि लॉकडाऊनने बंद झालेली बाजारपेठ यामुळे शेती उत्पादनाचे मोठे नुकसान गेल्या दोन वर्षात झाले आहे़ या नुकसानीनंतर यंदा शेतकरी फळ पिकांना ब्रेक देणार अशी शक्यता होती़ परंतू जिल्ह्यात याउलट स्थिती असून पपई आणि केळी या दोन पिकांना यंदाही पसंती कायम आहे़जिल्ह्यात यंदा पावसाने वेळोवेळी खंड देऊनही ९४ टक्के क्षेत्रात पिक पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि मूळ या पिकांचा समावेश आहे़ खरीप हंगामात सर्वाधिक पसंती कापसाला मिळाली असून आजअखेरीस ११७ टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे़ यातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान सव्वा लाख हेक्टरवर कापूस दिसून येणार अशी शक्यता आहे़ ९४ टक्के क्षेत्रात झालेल्या पेरण्या कोरड व बागायत क्षेत्रातील असल्याने शेतकरी फळ पिकांना यंदाच् थांबा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती़ पंरतू शेतकरी बागायती पिकांची लागवडही तेवढ्याच जोमाने करत आहे़ यातून आंबा, केळी, सिताफळ, लिंबू, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पपई आणि इतर फळ पिके एकूण ११ हजार हेक्टरवर बहरली आहेत़ गेल्या वर्षात ही आकडेवारी केवळ १० हजार हेक्टर होती़ यंदाच्या लागवड हंगामात १ हजार हेक्टरची प्रगती झाली असल्याची माहिती आहे़
४जिल्ह्यात आजअखेरीस २ लाख ७९ हजार १९१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे़ एकूण ९४ टक्के हा पीक पेरा आहे़४दुसरीकडे जिल्ह्यात ११ हजार ४३ हजार हेक्टर क्षेत्रात फळपिकांची लागवड आहे़ यात ५ हजार ८९ हेक्टरवर केळी तर ४ हजार ८६९ हेक्टरवर पपईची लागवड आहे़४नंदुरबार तालुक्यात ३३०, नवापूर ३३, अक्कलकुवा ११, तळोदा १ हजार ४५८ तर सर्वाधिक ३ हजार २५६ हेक्टर केळी लागवड ही शहादा तालुक्यात करण्यात आली आहे़४जिल्ह्यात यंदा सर्वाधिक ३ हजार ३१५ हेक्टर पपई शहादा तालुक्यात आहे़ त्याखालोखाल नंदुरबार १ हजार १६९, तळोदा ३७१ तर नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी सात हेक्टरवर पपई लागवड पूर्ण करण्यात आली आहे़ दुसरीकडे भाजीपाला पिकांची आकडेवारीही वाढली असून २२ हजार हेक्टरवर ही पिके डोलत आहेत़
शहादा सर्वात पुढेखरीप हंगामातील नियमित पिक पेरणीत शहादा तालुक्याने आघाडी घेतली आहे़ तालुक्यात ७४ हजार ८६८ हेक्टर पीक पेरा झाला आहे़ बागायती पिक पेरणीतही तालुका पुढे असून ६ हजार ५७१ हेक्टरवर केळी आणि पपई या या फळ पिकांची लागवड झाली आहे़कापूस लागवडीत वाढ झाल्याने बागायती क्षेत्रात घट येणार अशी शक्यता होती परंतू जिल्ह्यात आजअखेरीस १ लाख २४ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड पूर्ण झाली आहे़ त्यातुलनेत बागायती क्षेत्र कमी असले तरी इतर जिल्ह्याच्या मानाने पपईचे लागवड क्षेत्र राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे़