शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात घरपट्टीत यंदा वाढ नाही दहा टक्के मिळणार सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॅाकडाऊन आणि कोरोनामुळे शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत भरली तर दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॅाकडाऊन आणि कोरोनामुळे शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत भरली तर दहा टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.  याशिवाय पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे तीन महिन्याचे भाडे देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.    पालिकेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ऑनलाईन झाली. सभेच्या अजेंड्यावर एकुण १७ विषय होते. ते सर्व मंजुर करण्यात आले. दहा टक्के घरपट्टी माफकोरोना व लॅाकडाऊनमुळे अनेक कुटूंबांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे घरपट्टीत काही प्रमाणात सूट देण्याची मागणी  करण्यात येत होती. याबाबत     पालिका देखील गांभिर्याने विचार करीत होती. विरोधकांनी देखील मागणी लावून धरली. त्यामुळे पालिकेने घरपट्टीची नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत एकुण रक्कम एकाचवेळी भरली तर त्यात दहा टक्के सूट देण्याचाही निर्णय घेण्यात आला. याशिवाय पुर्नरमुल्यांकनात कुठलीही वाढ न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. दरम्यान, विरोधकांनी सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली होती. दुकान भाडे माफपालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांमधील भाड्याने दिलेली दुकाने लॅाकडाऊनध्ये बंद होती. त्यामुळे व्यवसाय ठप्प होता. असे असतांनाही दुकानदारांना भाड्याचा भुर्रदंड सहन करावा लागणार होता. ही बाब लक्षात घेता पालिकेने एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय देखील घेतला. त्यामुळे लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  डॅा.बाबासाहेबांचा पुतळाभारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरात आणखी   एक पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. शहरातील पालिका हद्दीतील सर्व्हे नंबर २१५-१ मधील प्लॅाट नंबर २८ च्या खाजगी जागेवर पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडे ना हरकत दाखल्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर चर्चा  होऊन निर्णय घेण्यात आला.विविध विषयांवर चर्चासभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात पालिका हद्दीतील मालमत्तांचे चतुर्थ वार्षीक कर अकारणी  अर्थात जनरल रिव्हीजन करण्यास मंजुरी देण्यात आली. भुयारी गटार योजनेच्या संकलन व्यवस्थेचे देखभाल दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक मंजुर करण्यासह इतर विषयांना मंजुरी देण्यात आली.