शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिंदा, विखरण व कोरीटला घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:51 IST

भितीचे वातावरण : एक लाख 56 हजारांचा ऐवज चोरीस

नंदुरबार : नाशिंदा, विखरण व कोरीट येथे धाडसी घरफोडीतून चोरटय़ांनी एक लाख 57 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे ग्रामिण भागात खळबळ उडाली आहे. तिन्ही ठिकाणच्या चो:यांबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिंदा येथील गोविंद पुंडलीक पाटील यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी चोरी केली. पाटील हे बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. बंद घराची संधी साधत चोरटय़ांनी कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटातून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागीने असा एकुण 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तातडीने तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत गोविंद पुंडलीक पाटील, रा.नाशिंदा यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी घटना विखरण येथे घडली. केशव वामन पाटील यांचे बंद घर लक्ष केले. घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरातील रोख रक्कम व सोने-चांदीचे दागीने असा एकुण 43 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. केशव वामन पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात  आला.तिसरी घटना कोरीट येथे घडली. वर्षा सुरेश पाटील यांचे बंद घर फोडण्यात आले. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरातील 43 हजार रुपयांचा ऐवज चोरून  नेला. सकाळी याबाबत वर्षा सुरेश पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अहिरे, सदाराव व गोसावी करीत आहे. या घटनांमुळे ग्रामिण भागात भितीचे वातावरण आहे.