शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांनी केली पावसाची नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी नव्वदी पार केली आहे. तळोदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी नव्वदी पार केली आहे. तळोदा व नंदुरबार तालुका तर पुर्ण 100 टक्केच्या घरात आहेत. 25 वर्षानंतर प्रथमच एवढा पाऊस झाला आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यात सरासरीचा केवळ 79 टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत. आता हे पाणी पुढील पावसाळ्यार्पयत सांभाळून वापरणे आवश्यक आहे.     जिल्ह्यात गेल्या 25 वर्षानंतर प्रथमच एवढा पाऊस झाला. यापूर्वी देखील जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. परंतु सर्वच भागात पावसाचा जोर नव्हता. केवळ काही महसूल मंडळे किंवा तालुक्यापुरती त्याची मर्यादा राहत होती. यंदाचा पाऊस जिल्हाभरात सर्वत्र कमी अधीक प्रमाणात सारखाच कोसळला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या अवघ्या सव्वादोन महिन्यातच सरासरीच्या 90 टक्केर्पयत पाऊस गेला आहे.तळोदा तालुक्यात सरासरीच्या ुतुलनेत सर्वाधिक 98.45 टक्के पाऊस झाला आहे. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात 96.83 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. धडगाव तालुक्यात 93.58 टक्के, नवापूर तालुक्यात 93.48 टक्के, शहादा तालुक्यात 92.12 टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस अक्कलकुवा तालुक्यात 78.62 टक्के झाला आहे. जिल्ह्यात आतार्पयत सरासरीच्या तुलनेत 88.66 टक्के पाऊस झाला आहे.  नंदुरबार जिल्ह्याची पावसाची सरासरी 835.83 मि.मी.आहे. त्या तुलनेत आतार्पयत 741.01 मि.मी.पाऊस झाला आहे.  या पावसामुळे जिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत.

विरचकची टक्केवार पाच टक्क्यांनी घटली.. विरचक प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी 82 टक्के पाणीसाठा होता. परंतु पाटबंधारे विभागाने प्रकल्पातील सहा हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रकल्पातील पाणीसाठा 77.63 टक्केवर आला आहे. असे असले तरी प्रकल्पात शिवण नदीतून पाण्याची आवक सुरूच आहे. पावसाळ्याचा आणखी दीड ते दोन महिना बाकी असल्यामुळे या काळात प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरू शकेल असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.