शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील नऊ मध्यम व १२ लघुसिंचन प्रकल्प प्रशासकीय अडचणीमुळे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार पाडवी यांनी त्यांच्याशी ...

राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार पाडवी यांनी त्यांच्याशी याप्रकरणी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात नऊ मध्यम प्रकल्प व १२ लघु पाटबंधारे याेजना असे विविध ठिकाणांचे असे २१ लहान- मोठे सिंचन प्रकल्प निधीअभावी व सुधारित प्रशासकीय मान्यताअभावी रखडलेले आहेत. साहजिकच यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर सिंचनाचा प्रश्नदेखील तसाच प्रलंबित आहे. यात नर्मदा नदी वळण योजना, उकाई धरणातील जलाशय, देहली, कोरडी, नागण अशा मोठ्या प्रकल्पांबरोबरच इच्छागाव्हण, धनपूर, रापापूर, सुसरी हरिमोळ असा प्रकल्पांचा समावेश आहे. नर्मदा नदीवळण योजना २०११ पासून प्रस्तावित आहे. यासाठी एक हजार ५३३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे नर्मदा जल लवादाच्या निर्णयानुसार साधारण १०.८९ अब्ज पाण्यापैकी पाच अब्ज घनफूट पाणी तापी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित आहे. त्यामुळे या कामालाही चालना देण्यात यावी. त्याचबरोबर उकई धरणाच्या बॅक वाॅटरमधून पाच अब्ज घनफूट पाणी उचलून यात अंदाजे तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेमुळे नंदुरबारसह तळोदा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याच्या फायदा होणार आहे. यासाठी ६८९ कोटी रुपयांची आवश्यकता असून, प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पडून आहे. वास्तविक २०१५ मध्ये शासनस्तरावर सामंजस्य करारदेखील झाला आहे. यावरही तातडीने कार्यवाही व्हावी. शिवाय देहाली, कोरडी, नागन हे मध्यम प्रकल्प किरकोळ कामांच्या निधीअभावी रखडले आहेत. कोरडी प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्णही झाले आहे. नागान मध्यम प्रकल्पासाठी १८०.२९ लाखांच्या निधीचा प्रस्ताव शासनदरबारी नवीन सुधारित मान्यतेकरिता पडून आहे. तळोदा तालुक्यातील इच्छगव्हाण, रापापूर हे लघु पाटबंधारे निधीसाठीच रखडले आहेत. त्यांचा सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावदेखील शासनास सादर केला आहे. परंतु, त्यावर अजून कार्यवाही करण्यात आलेली नाही. यात नवीन भूसंपादन व बुडीत कुटुंबांना मोबदला देणे बाकी आहे. शहादा तालुक्यातील सुसरी धरणाचा कालवा व वितरकांची कामे शिल्लक राहिल्यामुळे भूसंपादनअभावी रखडलेले आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातील या सर्व पाणी योजनांची कामे शासन स्तरावरील कार्यवाहीअभावी रखडली असून, आदिवासी शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या मोठा अनुशेष बाकी आहे. आपल्या स्तरावर रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची चौकशी करून संबंधित यंत्रणांना कार्यवाहीची सूचना द्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांचा हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तांत्रिक अडचणी, अंदाजपत्रके, भूसंपादन व निधीअभावी त्या-त्या विभागात प्रलंबित असून यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. सदर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. - उदेसिंग पाडवी, माजी आमदार.