लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वनराईत असलेल्या मौलीपाडा येथे निलीचारी, वाघदेव पुजा करण्यात आली. गावाचे रक्षण व्हावे तसेच वनराईतील वनभाजी, निली भाजीला संस्कृतीनुसार निलीचारी वाघदेव पुजाऱ्याकडून विधीनुसार पुजन झाल्यानंतर दºया खोºयातील वनराईत निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना त्याच्या रितीरिवाजानुसार विधीपरंपरानुसार पुजन केल्यानंतर वनराईतील वनभाजी खायला सुरूवात करीत असतात.सातपुड्याच्या डोंगराळ भागातील बांधवाचा पहिला सण असतो. वाघदेव पुजा झाल्यावरच जंगलातील पाले भाजी खाता येते. उदा. खाटो पेढो, माटलो व सागाचे पाने घरात आणू शकतात. गावातील सर्व लोकांना सुख शांती लाभो व गावातील सर्व लहान मुले, गाय, बकरी, जनावारे यांचे आरोग्य चांगले राहायला पाहिजे असा या मागचा उद्देश असतो.यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येत झाडाखाली वाघदेवच्या स्थानकाजवळ गोळा होतात. या वेळी विधी परंपरेनुसार पुजनास लागणारे साहित्य घेत निलीचिरी वाघदेवचे गावातील पुजाºयाकडून पुजन केले जाते. या वेळी गावातील प्रमुख वयोवृद्ध जानकारांना मानाचे स्थान देत त्यांच्यासह तरूणांचीही उपस्थिती असते. ग्रामस्थांसाठी या निलीचिरी वाघदेव पुजनानंतर वनभोजनाचे नियोजन करण्यात येत असते. यात लहानांपासून वयोवृद्धांचाही विशेष सहभाग दिसून येत असतो.
सातपुड्यात ठिकठिकाणी निलीचारी व वाघदेव पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:05 IST