शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात संतप्त शेतक:यांनी ठोकले वीज कार्यालयाला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:34 IST

कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा : अन्यथा औद्योगिक फिडर बंद पाडण्याचा इशारा

नवापूर : कृषी फिडरवरुन अल्प दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने हातातील पिकांचे नुकसान होत आहे. निवेदन देण्यासाठी येणार असल्याची पूर्वसुचना देवूनही संबंधीत अधिकारी  नसल्याचे पाहुन शेतक:यांनी कर्मचा:यांना बाहेर काढून विज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकले. दुपारी ही घटना घडली. भरत गावीत यांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले. तालुक्यातील बहुतांश भागात कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. उभे पिक हातातुन जात असल्याचे पाहण्याशिवाय शेतक:याकडे विकल्प नसल्याने गावा गावातील शेतकरी एकत्र आले. सहाय्यक विज अभियंता के.टी. ठाकरे यांना दोन दिवसा पुर्वी शेतक:यांनी नवापूर तालुक्यातील शेती पंपाचे सर्व फिडर वरुन कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यासाठी येणार असल्याची पूर्वसूचना दिली होती.  सावरट, नवागाव, खेकडा, रायपूर, कोळदा, वडखुट, उकाळापाणी, मोग्राणी, हळदाणी, बिलबारा, डोकारे वासदा व बंधारे आदी गावातील शेतकरी नवापूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले. मात्र के.टी.ठाकरे हे रजेवर गेल्याचे सांगण्यात आले.  त्याठिकाणी इतर कोणीही जवाबदार अधिकारी नसल्याचे पाहुन शेतकरी संतप्त झाले. त्यांनी विज कार्यालयातील कर्मचारी यांना बाहेर काढले व सर्व कार्यालयाच्या खोलींना कुलुप लाऊन नंतर प्रवेश व्दाराला कुलुप ठोकले. संतप्त  शेतक:यांनी घोषणाबाजी करत जो पयर्ंत कुणी जवाबदार अधिकारी येत नाही तो पयर्ंत आम्ही विज कार्यालयात कोणाला जाऊ देणार नाही अशी भुमिका घेतली. दुपारी दोन वाजता खांडबारा विज कार्यालयाचे अभियंता एस.एम.चव्हाण  नवापूर येथे दाखल झाले. नवापूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी मध्यस्थी करुन शेतक:यांना शांत करुन  अभियंता चव्हाण यांना निवेदन चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, नवापूर तालुक्यातील शेतक:यांच्या शेती पंपासाठी विज पुरवठा होत असलेले सावरट, नवागाव, खेकडा, रायपूर, कोळदा, वडखुट, उकाळापाणी, मोग्राणी, हळदाणी, बिलबारा, डोकारे वासदा व बंधारे येथील फिडरवरुन गेल्या दीड महिन्यापासून शेती पंपास अत्यंत कमी दाबाचा व अनियमित तथा लपंडावाने विज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतक:यांना वेगवेगळया पिकांना पाणी देता येत नाही. आठ तास वीज राहते. त्याचवेळी या समस्या येत असल्यामुळे शेतक:याचे शेती पंप चालत नाहीत.  शेतक:यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुनही विज पुरवठयात कुठलीही सुधारणा झालेली नाही. शेती पंपासाठी असलेला विज पुरवठा ताबडतोब सुरळीत करुन त्यात सुधारणा करण्यात यावी अन्यथा नवापूर तालुक्यातील शेतकरी आंदोलन करुन 24 तास इंडस्ट्रीयल वापरासाठी होत असलेल्या विज पुरवठ्याचे फिडर बंद पाडण्याचा निर्णय घेतील.  असा इशारा देण्यात आला. निवेदनावर पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवलसिंग गावीत, दिनकर मावची, अमृत पाडवी, संजय वसावे, राहुल नाईक, प्रफुल नाईक, शंकर गावीत, दिलीप कोकणी, विवेक गावीत, विरसिंग कोकणी, नरेश वसावे, राजेश वसावे, सुनिल वसावे, मिलिंद वसावे, जगन वळवी, फत्तेसिंग वसावे, दिलीप वसावे, सुबन कोकणी, भिमसिंग गावीत, शेगा मावची, प्रकाश नाईक, संजु वसावे, अभसिंग वसावे, सुरेश गावीत यांच्यासह असंख्य शेतक:यांच्या सह्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, उपनिरीक्षक संदिप पाटील, हवालदार निजाम पाडवी, योगेश थोरात, मोहन साळवे आदीनी बंदोबस्त ठेवला होता.