लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघ्या भारतात नवरात्रोतसव सुरु होण्यापूर्वीच चंद्र व सुर्यावरुन कालगणना करणारे सातपुडय़ातील आदिवासी बांधव काही दिवसांपासून नवाय पूजा करीत आहे. त्यांना दीपोत्सवाचे वेध लागले असून नवीन धान्य पूजनाची देखील तेथे तयारी सुरू झाली आहे.आधुनिक साधनांचा वापर न करता केवळ चंद्र व सुर्यावरुन कालगणना करण्याची परंपरा सातपुडय़ात आजही टिकून आहे. भाद्रपद आमावास्येनंतर संपूर्ण भारतात नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. याच कालावधीत सातपुडय़ातील आदिवासींमध्ये नवाय पूजा होते. या पूजेला काही दिवसांपासून सुरूवात झाली असली तरी आमावास्येनंतर नऊ दिवस मोजण्याची परंपरा आहेत. या नऊ दिवसाच्या कालावधीत नवाय पूजेचा समारोप होतो. त्यानंतर त्यांना काठीच्या येथे साजरी होणा:या दस:याची प्रतीक्षा असते. काठीचा हा सण परंपरेनुसार आमावास्येनंतर दहाव्या दिवशी साजरा होणार आहे.
सातपुडय़ात नवाय पूजेची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:53 IST