शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ताप्ती सेक्शनवर नव्याने दोन मेमू ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:27 IST

नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली ...

नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली आहे. मुंबई-सुरत-अहमदाबाद या व्यस्त रेल्वे लाईनवरील अनेक प्रवासी गाडय़ा आता नंदुरबार, भुसावळमार्गे वळविण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार-उधना व उधना-जळगाव अशा दोन नवीन मेमू ट्रेन देखील लवकरच या मार्गावर सुरू होणार आहेत. मुंबईसाठी देखील बांद्रा-मुंबई ही एक्सप्रेस नंदुरबारमार्गे सुरू होत आहे.पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा महत्वाचा ठरलेला सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण झाले आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा कमी भार लक्षात घेता व्यस्त रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी गाडय़ा या मार्गावर आता वळविण्यात आल्या आहेत. काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला जिल्ह्यातील लोकांचे सुरत, वापी, बलसाड, उधनाशी नाते जोडले गेले आहे. या जिल्ह्यंमधील अनेक कुटूंबे वर्षानुवर्ष सुरत, उधना या भागात उद्योगधंदे, रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भुसावळ-सुरत या पॅसेंजर रेल्वेला नेहमीच मोठा प्रतिसाद असतो. ही बाब लक्षात    घेता या मार्गावर सर्वसामान्यांना  प्रवास दर परवडेल अशा पद्धतीने नवीन रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दोन नवीन मेमू ट्रेन येत्या काळात सुरू होत आहेत.सुरत-नंदुरबार ही मेमू ट्रेन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. रात्री साडेअकरा वाजता ही मेमू ट्रेन नंदुरबारला येते. पहाटे 2.20 वाजता ती सुरतकडे रवाना होते. या प्रवासी गाडीला मोठा प्रतिसाद आहे. या व्यतिरिक्त आता आणखी दोन मेमू ट्रेन या मार्गावर सुरू होत आहेत. त्यात उधना-नंदुरबार व उधना-जळगाव या मेमू ट्रेनचा समावेश आहे. उधना-नंदुरबार ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता उधनाहून निघेल व 12.15 वाजता नंदुरबारला पोहचणार आहे. तर नंदुरबारहून दुपारी 1 वाजता उधनाकडे रवाना होईल. याशिवाय उधना-जळगाव ही ट्रेन सकाळी 10.20 वाजता निघेल तर जळगावहून मध्यरात्री 12.45 वाजता उधनाकडे निघणार आहे.  दररोज ही ट्रेन धावणार आहे. एकुण सर्वसाधारण श्रेणीच्या 12 डब्यांची रेल्वे राहणार आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या मुंबईसाठीच्या नवीन एक्सप्रेसला देखील मंजुरी मिळाली असून लवकरच ती धावणार आहे. बांद्रा-भुसावळ अशी ही एक्सप्रेस राहणार आहे. ती दररोज धावणार असून तिचे शेडय़ूल देखील तयार करण्यात आले आहे. ही एक्सप्रेस उधना व सुरत स्थानकांवर न जाता चलथानपासून मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गाला जोडून भेस्तानमार्गे मुंबईकडे जाणार आहे. यामुळे जळगाव, अमळनेर, नंदुरबारहून मुंबईकडे जाणा:या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय येत्या काळात आणखी काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा  या मार्गावरून धावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.