शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांबाबत तळोद्यात उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत उदासिनता दिसून येत आह़े जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकारणाकडून एकही काम  घेण्यात आले नसल्याचे समजत़ेतालुका प्रशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असला तरी, हा प्रस्ताव पहिला तर वरील तिन्ही यंत्रणा या कामांबाबत उदासीन असल्याचे दिसून येत़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत उदासिनता दिसून येत आह़े जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकारणाकडून एकही काम  घेण्यात आले नसल्याचे समजत़ेतालुका प्रशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असला तरी, हा प्रस्ताव पहिला तर वरील तिन्ही यंत्रणा या कामांबाबत उदासीन असल्याचे दिसून येत़े या विभागांनी एकही काम घेतली नसल्याचे समजत़े त्यासोबतच इतरांनीदेखील अतिशय कमी कामे घेतल्याचे चित्र आहे.भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करुन पाणी टंचाईवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी शासनाने 2015 पासून ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जात आहे. तथापि तळोदा तालुक्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती नसल्याने पहिल्या वर्षी तालुक्यास या योजनेतून वगळण्यात आले होत़े साहजिकच ग्रामीण भागातील आदिवासी जनतेमध्ये याबाबत तीव्र नाराजी पसरली होती. या योजनेत तळोदा तालुक्याचाही समावेश करावा अशी मागणी होती. यासाठी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करत योजनेत तळोदा तालुक्याचा समावेश करण्यास भाग पाडले. 2016 मध्ये सुरुवातीस सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा योजनेअंतर्गत  समावेश करत तेथे जलयुक्तची कामे करण्यात आली. तेथे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर गेल्या वर्षी 9 ते 10 गावे या योजनेंतर्गत घेण्यात आली. यंदाही तालुका प्रशासनाने या योजनेसाठी जिल्हा प्रशासनाकडे निविदा प्रस्ताव पाठवले आह़े. या प्रस्तावात तालुका कृषी विभाग, जिल्हा परिषदेचे लघुसिंचन, जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत, जलसंधारण स्थानिकस्तर, वनविभाग व सामाजिक वनीकरण अशा सात विभागांकडून कामांचे प्रस्ताव मागवण्यात आले होत़े परंतु यातील जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकरण या तिन्ही यंत्रणांनी यंदा एकही काम घेतले नसल्याचे समजत़े या शिवाय कृषी विभाग व ग्रामपंचायत वगळता इतरांनीदेखील अतिशय कमी कामे घेतल्याची माहिती आहे. जलयुक्तअंतर्गत यंदा एकूण 118 कामे घेण्यात आली आहेत़ त्यातही 16 कामे जुनी आहेत. सर्वात जास्त कामे कृषी विभागाची आह़े नाला खोलीकरण, माती, सिमेंट, बांधाचे खोलीकरण, दुरुस्ती, गाव तलाव,  बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, वनतळे, बंधारे अशा कामांचा समावेश आहे. वास्तविक या योजनेमुळे तालुक्यात खोलवर गेलेली पाण्याची पातळी मोठय़ा  प्रमाणात वाढून सध्या तरी तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती नसल्याचे चित्र आहे. मात्र काही यंत्रणांनी या योजनेबाबत उदासीन भूमिका घेत शेतक:यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. आजही तालुक्यात जलसंधारणाच्या कामांची गरज आह़े शिवाय वृक्ष लागवडही गरजेची आह़े मात्र या दोन्ही याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. एकीकडे शासन ही योजना यशस्वी करण्यासाठी अथक प्रय} करीत असतांना शासनाचीच दुसरी यंत्रणा याबाबत उदासिन धोरण अंगीकारत आह़े त्यामुळे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशी करुन संबंधितांना याबाबत जाब विचारणे गरजेचे आह़े