शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सारंगखेडा बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:47 IST

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने बॅरेज व नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया जॅकवेल व इलेक्ट्रीक मोटारींना पाणी उपलब्ध होत नसल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची कसरत सुरू आहे.सारंगखेडा व ...

ठळक मुद्दे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याची गरज पिकांसह पाणीपुरवठ्यालाही फटका

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने बॅरेज व नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया जॅकवेल व इलेक्ट्रीक मोटारींना पाणी उपलब्ध होत नसल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची कसरत सुरू आहे.सारंगखेडा व परिसरात जून महिन्यात ७ व ८ तारखेला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र श्रावण सरीच बरसल्या. अद्यापही या भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा आतापर्यंतच्या पावसाळ्यात कोणतेही नदी-नाले वाहून निघाले नाहीत. त्यातच १५ दिवसांपासून सारंगखेडा बॅरेजचे सर्व २६ दरवाजे उघडण्यात आल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी           स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात जोरदार पाऊस नसल्याने बागायती व कोरडवाहू क्षेत्रातील पिके               धोक्यात आली आहेत. अनेक शेतकºयांनी तापी नदीवर इलेक्ट्रीक मोटारी ठेवून पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पाणी नेले आहे. मात्र तापी नदीचे पात्र कोरडे झाल्याने पाणी उपलब्ध होत नाही. बागायती  पिकांना पाणी देणे आवश्यक असताना पाणी मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडण्याच्या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकºयांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीतापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सारंगखेडा बॅरेजच्या साठवून ठेवलेल्या पाण्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र बॅरेजमध्ये व नदीपात्रात दरवाजे उघडल्यामुळे पाणीसाठा नसल्याने या गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तर शेतकºयांना पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असून तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.पालकमंत्र्यांनी लक्ष घालावेजिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अर्ध्या नंदुरबार जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. त्यामुळे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजसमध्ये तरी थोडाफार पाणीसाठा व्हावा म्हणून पालकमंत्री रावल          यांनी संबंधित विभागांना तातडीने बॅरेजेसचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

शहादा शहराचा पाणी प्रश्नही गंभीर होणारशहादा शहरालादेखील सारंगखेडा बॅरेजमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने शहादा शहराला पाणीपुरवठा होणाºया योजनेच्या जॅकवेलमध्ये पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शहादा वासीयांनाही पाणी कमी मिळत आहे. या जॅकवेलमधून दिवसाला फक्त तीन ते चार तास पाणी उपसा होतो, अशी माहिती ठेकेदार शिवाजी मिस्तरी यांनी दिली. बॅरेजचे दरवाजे त्वरित बंद केले नाही तर शहादा शहराचा पाणी प्रश्नही गंभीर होणार आहे.

बॅरेजचे दरवाजे बंद करण्यासंदर्भात मुख्य कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांमार्फत सूचना आलेल्या नाहीत व नियमाप्रमाणे १५ सप्टेंबरशिवाय दरवाजे बंद करता येत नाहीत. तसेच दरवाजे दुरुस्ती व आॅईल ग्रिसींगचेही काम सुरू आहे. परंतु आम्हाला शेतकरी, ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतींनी विनंती पत्र दिल्यास ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवून त्याबाबत वरिष्ठांचा आदेश  आला तर दरवाजे बंद करू.-ए.एस. बांगर, उपअभियंता, सारंगखेडा बॅरेज.