शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

डामरखेडय़ाजवळील पुलाच्या दुरुस्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:41 PM

गोमाई नदीवरील पूल : संरक्षक कठडे निकामी, रस्त्यावरही मोठमोठे खड्डे

प्रकाशा : शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे            पूर्णपणे तुटले असून पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात अवजड वाहन           आदळले तर पूल हलतो, अशी           स्थिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने काही दुर्घटना घडण्याअगोदरच पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवर सुमारे 40 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला दोनवेळा महापुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. आजच्या स्थितीत पुलाची अवस्था फारच बिकट झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे सिमेंटचे असून ते पूर्णपणे तुटले आहेत. या कठडय़ांना धक्का लावताच ते पडतील की काय अशी स्थिती आहे. पुलावरील  रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये अवजड वाहन आदळले तर पूल अक्षरश: हलतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावर पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाईप काढण्यात आले आहेत. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला व या पाईपांजवळ माती साचल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. पाऊस झाल्यावर या पुलावर पाण्याचे डबके साचतात. त्यातच खड्डे असल्याने वाहने आदळून अपघातही होतात. पुलाच्या दोन्ही टोकाला अर्धवट भिंती बांधलेल्या आहेत.              या भिंतींना तडे पडून त्या              तिरकस झालेल्या आहेत. पूल ज्या खांबांवर उभा आहे त्या खांबांच्या लोखंडी सळ्याही बाहेर आलेल्या आहेत.या पुलाची पडझड झाली तर या मार्गावरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. वाहनचालकांना 70 ते 80 किलोमीटरचा फेरा मारून शहादा, सारंगखेडा, कोपर्ली, नंदुरबारमार्गे वाहतूक करावी लागेल. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित विभागाने या पुलाची चांगल्याप्रकारे डागडूजी व दुरुस्ती करण्याची गरज आहे.