शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

By admin | Updated: January 9, 2017 22:54 IST

नोटबंदी : तहसीलदारांना निवेदन सादर

शहादा : केंद्र सरकारने हजार व 500 रुपयांच्या नोटा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहादा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  50 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरही देशातील गरीब जनतेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकांच्या बाहेर अद्यापही रांगा कमी झालेल्या नसून अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. शेतमालाचा भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने 50 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे सांगितले होते. त्यापेक्षा जास्त दिवस लोटल्याने परिस्थिती सुधारली नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे आक्रोश मोर्चाद्वारे केंद्र शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माधव गोविंद पाटील, डॉ.आनंद बन्सीलाल पाटील, लोणखेडय़ाचे माजी उपसरपंच हरी लिमजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शांतीलाल पाटील, सरपंच काशिराम ठाकरे, धरमसिंग पावरा, सुरेंद्र कुवर, चैत्राम ठाकरे, आपसिंग पावरा, आधारसिंग गिरासे, भाईदास वसावे, लालसिंग पवार, विनोद मोरे, जगदीश पाटील, रतीलाल पवार, विजय वळवी, विजय वाघ, जुत्या ठाकरे, दिनेश खर्डे, गणेश वळवी, दिनेश वाघ, दिनेश पाटील, ब्रिजलाल पावरा, सुकदेव वळवी, दिलीप पावरा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.     (वार्ताहर)नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही निवेदन4राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेदेखील नोटाबंदीविरुद्ध जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नोटबंदीचा निर्णय जाहीर करून 50 दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरीही सर्वसामान्य जनतेला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. शेतीमालाचा भाव कोसळल्याने शेतकर अडचणीत आले आहेत. शासनाने 50 दिवसात परिस्थिती सुधारेल असे जाहीर केले होते. परंतु त्यात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आक्रोश मोर्चाद्वारे आंदोलन करून केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, विश्वनाथ वळवी, अमोल भारती, जितेंद्र मराठे, राजेंद्र पाटील, युनूस पठाण, महेंद्र चौधरी, संजू सोनवणे, प्रवीण पाटील, वामन पिंपळे, योगेश ठाकरे, रवींद्र सोनवणे, शेख शब्बीर शेख आदी उपस्थित होते.