शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर : जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यात संततधार पावसाचा जोर कमी झाला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात संततधार पावसाचा जोर कमी झाला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद झाल्याने राजमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या अधिका:यांनी रायंगण व वजीरपाडा येथे भेटी दिल्या.  रायंगण शिवारात महामार्ग क्रमांक सहावरील पुलाची ब्रिटिशकालीन फरशी तुटल्याने महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी सायंकाळी पूर्णत: बंद झाली होती तर नागङिारी जवळच्या वजीरपाडा येथील पूल वाहून गेल्याने 10 गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसाचा जोर शनिवारी ओसरला. अवजड व जास्त वाहतुकीच्या वर्दळीने नेहमी चर्चेत राहत आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार वळविण्यात आल्याने आज महामार्गावर शुकशुकाट होता. गुजरातमधून येणारी अवजड वाहने उच्छल, निझर, नंदुरबार व कुकरमुंडा, तळोदा, शहादा, शिरपूरमार्गे तर धुळ्याकडून येणारी वाहने सोनगीर, दोंडाईचा, शहादा, तळोदा, कुकरमुंडा, उच्छलमार्गे वळविण्यात आली आहे. धुळ्याकडून ये-जा करणारे कार, जीप, एस.टी. बस व शालेय बस या वाहनांना धुळे, साक्री, पिंपळनेर, चरणमाळमार्गे वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद झाल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या अधिका:यांनी रायंगण व वजीरपाडा येथे भेटी दिल्या. आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जि.प.चे माजी सदस्य रमेश ठाकूर गावीत, रायपूरचे सरपंच ईश्वर गावीत उपस्थित होते. वजीरपाडा येथे नदीपात्रात असलेले विद्युत  ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तेथे विद्युत पुरवठा पूर्ववत करणे आवश्यक आहे. तालुक्यातील प्रमुख नद्यांसह इतर नद्या व नाल्यांना आलेला पूर शनिवारी ओसरल्याने ग्रामीण भागातील रोखण्यात आलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली. लगतच्या जिल्ह्यातील विविध आगारांच्या बसेसही सुरत, वापी व नवसारीकडे  आज धावल्या.