शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Vidhan Sabha 2019: राष्ट्रवादीची व्टिस्टमुळे रंगत वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:56 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : राज्यातील विधान सभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची निवडणुका एकत्रित ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :

राज्यातील विधान सभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची निवडणुका एकत्रित लढण्याबाबत आपसातील बोलणी सुरू असली तरी शहादा विधानसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवार सक्रीय झाले आहेत.  असे असले तरी सर्वाच्याच नजरा सत्ताधारी भाजपा-सेना युतीकडे लागल्या आहेत. आघाडीतील बंडखोरी अटळ असल्याचे चित्र राष्ट्रवादीच्या नाराजीवरून दिसून येत आहे. शहादा विधानसभा मतदार संघ 2009 पूर्वी सर्वसाधारण गटासाठी होता. त्यामुळे मतदार संघाचे नेतृत्व सहकार महर्षी स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी अनेक वेळा केले होते. त्या वेळी शहादा-दोंडाईचा म्हणून हा मतदार संघ ओळखला जात होता. मात्र 2009 मध्ये शासनाने मतदार संघाची पुनर्रचना करून या मतदार संघात तळोदा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. नवीन पुनर्रचनेत अनुसूचित जमाती अर्थात एस.टी. प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. मतदार संघाचा इतिहास पाहता पूर्वीचा जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या चार राजकीय पक्षांना संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी हे चार ही प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले होते. त्याचबरोबर माकपा, मनसे हे पक्षही लढले होते. त्यामुळे मतांच्या विभाजनामुळे निवडणूक अतिशय चुरशीची होऊन भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी हे केवळ 713 मतांनी निवडून आले होते. आता सर्वच राजकीय पक्ष्यातील इच्छूक उमेदवार मतदार संघात सक्रीय झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे साहजिकच सत्ताधारी भाजपात इच्छूकांची संख्यादेखील वाढली आहे. विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी हे स्वत: दावेदार असले तरी त्यांचे पूत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी व पक्षाचे जिल्हा अनुसूचित जमातीचे जिल्हाध्यक्ष रूपसिंग पाडवी यांनीही नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आघाडीतही सर्व काही आलबेल आहे असे नाही.  माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनीच फक्त मुलाखत दिल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. युती होऊ नये म्हणून इच्छूकांनीही देव पाण्यात ठेवले आहेत. या परिस्थितीमुळे साहजिकच पक्षांतरही घडण्याची शक्यता आहे.

विजयाचे गणित असते दोलायमान : शहादा तालुक्यातील तापीकडचा भाग वगळून संपूर्ण तळोदा तालुका जोडण्यात आला आहे. त्यामुळे शाहू मतदारांची संख्या बरीच आहे. त्यामुळे येथील गणितदेखील दोलायमान राहिले आहे. लोकसभेत भाजपला 1700 मतांची आघाडी.. : गेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या डॉ.हिना गावीत यांना शहादा-तळोदा मतदार संघातून केवळ एक हजार 700 मतांचे मताधिक्य मिळाले होते. साहजिकच यामुळे भाजपाच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातही शहादा तालुक्यातून हे मताधिक्य प्राप्त झाले आहे. तळोदा तालुक्यात काँग्रेसला अधिक मते होती. त्यातच भाजपा नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असली तरी अजूनही अंतर्गत धूसफूस सुरूच असल्याचे म्हटले जात आहे. कारण गेल्या पाच वर्षात गावीत गट व पाडवी गट या दोघांना एकमेकांवरील कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कितपत कामाला लागतील याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.इच्छूकांची यंदाही राहणार गर्दी.. : यंदाही मतदार संघामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपाकडून स्वत: विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासह रूपसिंग पाडवी, राजेश पाडवी, सुनील चव्हाण, काँग्रेसतर्फे अॅड.पद्माकर वळवी, राष्ट्रवादी राजेंद्रकुमार गावीत, शिवसेना रीना पाडवी, सखाराम मोते, अपक्ष सेवानिवृत्त्त अभियंता ङोलसिंग पावरा, मदन मिठय़ा पावरा, मोहन शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल 11 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादीमधील नाराजी कुणाच्या पथ्यावर.. : या निवडणुकीत कांग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेसलाच सोडल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामाने एक प्रकारे आघाडीस धक्काच बसला आहे. कारण मतदार संघात त्यांच्या मोठा दबदबा आहे. शिवाय काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या जान्याने आघडीच्या अडचणीत निश्चित भर पडली आहे. दूसरीकडे राजेंद्रकुमार गावीत यांनी जो पक्ष टिकिट देईल त्याचाकडून उभा राहणार असल्याचे संकेत दिल्यामुळे सत्ताधारी युतीच्याही पर्याय त्यांच्या पुढे असल्याने युतीतील इच्छुकांची डोकेदु:खी वाढली असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. 

काँग्रेस,भाजप सक्रीय..

 काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाली असली तरी सत्ताधारी भाजपा-सेना युतीकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. अजूनही युतीची नाव पाण्यात आहे. त्यामुळे हा मतदार संघ कोणाकडे सुटतो यावरही उमेदवारी अवलंबून राहणार आहे. आघाडीतही तिच स्थिती आहे. कारण राष्ट्रवादीने दावा केल्यामुळे त्यांचेही चित्र स्पष्ट झालेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. तथापि मतदार संघात भाजपाचा आमदार निवडून आल्यानंतर त्यानंतर झालेल्या शहादा व तळोदा पालिकांची सत्ता भाजपाने काबीज करून आपल्या वर्चस्वाखाली संस्था आणल्या आहेत. परंतु दोन्ही तालुक्यांमधील पंचायत समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तळोदा बाजार समिती व शहादा बाजार समिती भाजपाकडे आहेत.शहादा मतदार संघाचा इतिहास पाहिला तर एकाही उमेदवाराला पुन्हा दुस:यांदा संधी देण्यात आलेली नाही. अगदी स्व.पी.के.अण्णा पाटील, दादासाहेब रावल, हेमंत देशमुख, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांचे उदाहरण सांगता येईल. अॅड.पद्माकर वळवी हे पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये प्रथम निवडून आले होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी उमेदवारीचा दावा केला असला तरी त्यांना तिकीटाची लॉटरी लागते की नाही, हे पहावे लागणार आहे.

होऊ घातलेल्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या 18 हजार 238  इतकी वाढली. 2014 च्या निवडणुकीत मतदार संघात एकुण 2 लाख 86 हजार,174 मतदार होते. यापैकी पुरुष 1,45,791 तर स्त्री 1,40,382 अशी वर्गवारी होती. 2019 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या 34,099 इतकी वाढली असून यात स्त्री मतदारांची वाढ 15,119 इतकी आहे. या निवडणुकीसाठी 3,20,273 मतदारांची नोंद झाली असून, पुरुष 1,61,648 तर महिला मतदार 1,58,620 आहे. वाढीव मतदार हे युवा  आहे.