देशभरातून सुमारे ३०० हून अधिक लोकांनी या वेबिनारसाठी नोंदणी केली. खर्डे यांनी संयुक्त राष्ट्राचा ‘शाश्वत विकास’ कार्यक्रमांतर्गत ‘कोणालाही मागे न ठेवणे’ या संकल्पनेची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, जागतिक महिला दिवस किंवा जागतिक आदिवासी दिवस इत्यादी केवळ साजरे करून चालणार नाही तर खरी वैचारिक प्रगती होणे गरजेचे आहे. त्यांनी आवाहन केले की, समाजाच्या सर्व सबल घटकांनी एकत्र येऊन दुर्बल घटकांना मदतीचा हात दिला पाहिजे जेणेकरून कोणीही मागे राहणार नाही आणि पूर्ण राष्ट्राचा विकास होईल. विधी महाविद्यालय नंदुरबार यांनी आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम राबविला त्याबद्दल खर्डे यांनी आनंद व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी यांनी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या तरतुदींची सविस्तर माहिती दिली. आदिवासी बांधवांमध्ये कायदे विषयक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विधी महाविद्यालयाने अनेक मोफत कायदेविषयक साक्षरता शिबिर राबवले असल्याची माहिती दिली. प्रा.डॉ.आशा तिवारी यांनी वेबिनारचे नियोजन व संचलन केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र रघुवंशी तसेच सचिव यशवंत पाटील व सर्व संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले.
ग्रामपंचायत, खांडबारा
खांडबारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी आद्य क्रांतिकारक व कुलस्वामिनी याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी खांडबारा ग्रामपंचायतीचे बदलून गेलेले ग्रामविकास अधिकारी कै अशोक सूर्यवंशी यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी शैलैश गावीत, पंचायत समिती सदस्य छगन महाले, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष संतोष गावीत, उपाध्यक्ष शशिकांत वळवी, सचिव जगदीश गावीत, पद्माकर शिंदे, अनिल शर्मा, जगदीश चौधरी, योगेश चौधरी, दीपक गावीत, वरून गावीत, राहुल वाडीले, विशाल नाईक, जे.डी. पाडवी, शीतल वळवी, मनीष वळवी, अजय पटले, यशवंत वळवी, गुरू गावीत, उमेश पाडवी, राकेश वसावे, कुंदन वळवी, बंटी पाडवी, सोमू वसावे, ग्राम विकास अधिकारी विजय अहिरे आदी उपस्थित होते.