शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्याच्या सारस्वताचा लेखणीला राष्ट्रीय आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:44 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साने गुरुजी, विनोबा भावे आणि म.गांधींच्या साहित्यावर सखोल अभ्यास करणारे गांधीवादी ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साने गुरुजी, विनोबा भावे आणि म.गांधींच्या साहित्यावर सखोल अभ्यास करणारे गांधीवादी साहित्यिक डॉ.विश्वास पाटील यांच्या ‘कस्तूरी परिमल’ या ग्रंथांचे भारत सरकारच्या सुचना व प्रसारन विभागाने प्रकाशन केले आहे. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशनामुळे शहाद्यातील सारस्वताच्या लेखणीला राष्ट्रीय आयाम मिळाला आहे.  म.गांधींच्या सहचारिणी कस्तूरबा गांधी यांचा जीवनपटही गांधींइतकाच मोलाचा आहे. मात्र, त्यांच्या संदर्भात फारसे कुठे लिहिले गेले नाही. गिरिराज किशोर यांचा ‘बा’ हा ग्रंथ वगळता इतर कुठलेही साहित्य कस्तुरबा गांधी यांच्या संदर्भात सापडत नाही. या पाश्र्वभुमीवर डॉ.विश्वास पाटील यांनी गांधी आणि विनोबा भावें संदर्भातील संशोधनात्मक लेखन करीत असतांना त्यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनपटासंदर्भात लेखन केले. सुरुवातीला ‘कस्तूरी गंध’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचे प्रकाशान जळगाव येथील गांधी तिर्थने केले होते. त्यासाठी म.गांधी यांचे नातू अरुण गांधी व पणतू तुषार गांधी हे प्रकाशनासाठी आले होते. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. त्याची दखल भारत सरकारच्या सुचना व प्रसारण मंत्रालयाने घेतली आणि डॉ.विश्वास पाटील यांना कस्तूरबा संदर्भात चरित्र ग्रंथ लिहिण्याचे सांगितले. त्यानुसार डॉ.विश्वास पाटील यांनी ‘कस्तूरी परिमल’ हा चरित्रपर कादंबरी ग्रंथ लिहिला. त्याचे प्रकाशन भारत सरकारच्या सुचनाप्रकाशन विभागाने केले आहे. या ग्रंथाचे नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन झाले. सुमारे सव्वादोनशे पानांचा हा ग्रंथ असून त्यात कस्तूरबांचा म.गांधींसोबत ‘मोहन ते महात्मा’ बनण्यार्पयतचा प्रवासात कस्तूरबा एक सहचारिणी व धर्मप}ी म्हणून काय भुमिका राहिली आहे त्याचा जीवनप्रवासाचा उलगडा आहे. 

रचनात्मक कार्याचा प्रवास.. कस्तूरी परिमल या ग्रंथात कस्तूरबांचा आश्रमातील, स्वातंत्र्य लढय़ातील आणि तुरुंगातील जीवनाचा प्रवास मांडला आहे. त्यांच्या रचनात्मक कार्याची दखल या ग्रंथात घेण्यात आली आहे. कस्तूरबांचा गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण अफ्रिका यासह     भारतातील विविध भागात म.गांधींसोबतचा प्रवास वर्णन त्यात मांडले आहे. त्या      केवळ गांधींच्या सहचारिणी नव्हत्या तर गांधींच्या अनेक निर्णयात त्यांची भुमिकाही महत्त्वाची ठरली आहे. त्यासंदर्भातील वर्णन लेखकाने त्यात अतिशय समर्पकपणे मांडले आहे.