शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कलाल समाजाच्या एकत्रिकरणाच्या उद्देशाने नाशिक ते तळोदा सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:25 IST

मिरवणूक काढून समाज बांधवांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कआमलाड : क्षत्रिय कलाल समाजाच्या एकत्रिकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने नाशिक ते तळोदा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचा तळोदा शहरात समारोप करण्यात आला. या वेळी कलाल समाजाच्या वतीने मिरवणूक काढून या सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. नाशिक येथून 26 ऑक्टोबरला रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीचा मार्ग पिंपळगाव, चांदवड, मालेगाव, आर्वी, धुळे, शिरपूर, शहादामार्गे तळोदा येथे पोहोचल्यावर गणपती गल्लीतील कलाल समाजवाडी येथे स्वागत करून रॅलीचा समारोप करण्यात आला होता. शहरात आल्यानंतर समाजाचे अध्यक्ष संजय कलाल यांनी सप}ीक या सायकल रॅलीची आरती ओवाळून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नंतर संपूर्ण तळोदा शहरातून वाजत-गाजत या सायकल रॅलीची मिरवणूक काढून रॅलीमध्ये भाग घेतलेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गणपती गल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिरपूर येथील समाजाचे अध्यक्ष जगदीश कलाल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र कलाल समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कलाल, ज्येष्ठ सल्लागार ए.व्ही. कलाल, कलाल समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा भारतीबाई कलाल, व नंदुरबार येथील पी.एस.आय. पदमा कलाल, नाशिक येथील विभागीय आयुक्त राजेंद्र कलाल, प्रदीप कलाल, राहुल सोनवणे व समाज बांधव उपस्थित होते. या वेळी नाशिक येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त राजेंद्र कलाल म्हणाले की, दीड महिन्यांपूर्वी मी आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर सायकल रॅलीचा विचार मांडला व त्याला ग्रुपमध्ये असलेल्या समाज बांधवांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला व लगेच आम्ही या रॅलीच्या नियोजनासाठी कामाला लागलो. समाज बांधवांनी उत्साह दाखवून कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने व एक मोठी समाजाची शक्ती यातून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदीप बागुल म्हणाले की, आम्ही दररोज शंभर किलोमीटर सायकलचा प्रवास करायचो. कलाल समाजात एकत्रिकरणाची मोठी शक्ती आहे व ही शक्ती सायकल रॅलीतून दिसून आली. जगदीश कलाल म्हणाले की, सायकल रॅलीची संकल्पना अत्यंत चांगली असून समाजातील लोकांना एकत्र करून विचारांचे आदान प्रदान करता आले. समाजाने एकजूट होऊन एक संघटनाच निर्माण झाली पाहिजे. सायकल रॅलीमुळे आपल्या समाजात एक चेतना निर्माण झाल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचसलन अक्षय कलाल यांनी तर आभार संजय कलाल यांनी मानले. कार्यक्रमासाठी तळोदा कलाल समाज बांधव व नवयुवक समाज मंडळ यानी परिश्रम घेतले.