शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

नर्मदा प्रकल्पग्रस्तांचे ‘चूल बंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सरदार सरोवर धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने होणा:या विस्थापना विरोधात व न्याय्य पुनर्वसनाच्या मागणीसाठी छोटा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सरदार सरोवर धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने होणा:या विस्थापना विरोधात व न्याय्य पुनर्वसनाच्या मागणीसाठी छोटा बडदा (मध्य प्रदेश) येथे नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर व विस्थापित नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठींबा व केंद्र सरकारसह मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ सोमवारी चिखली पुनर्वसन, ता.शहादा व रेवानगर, ता.तळोदा येथील प्रकल्पबाधितांनी ‘चुली बंद’ आंदोलन केले.सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी 134.97 मीटर्पयत गेल्याने  अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, डनेल, मुखडी या  गावातील आणि धडगाव तालुक्यातील  अठ्ठी, नाल्यापाडा, उतारपाडा, भरड, केली, थुवाणी, शेलगदा, भेबळपाडा, भादल या गावात बुडिताची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील शेकडो  विस्थापित कुटुंबे पुनर्वसनाविना आजही मूळ गावात राहत आहेत. धडगाव तालुक्यातील भादल गावातील लोकांची घरे, शेती बुडितात जात असताना सरकारची कोणतीही यंत्रणा तेथे गेलेली नाही. मणिबेली या धरणाच्या पाण्यामुळे बुडितात गेलेल्या पहिल्या गावात नारायण चिमा तडवी व नारायणभाई यांना गुजरातमध्ये दिलेल्या जमिनीच्या संदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सोडवलेला नाही.  शासनाच्या नजरेत विकासाचे मंदिर अर्थातच सरदार सरोवराचे धरण बांधण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश,  व गुजरातमधील ज्या विस्थापितांनी त्याग केला त्यांच्या आयुष्याचा विनाश करण्यासाठी यावर्षी पुनर्वसन पूर्ण झालेले नसताना, केंद्र सरकार, नर्मदा नियंत्रण प्राधिकरण, महाराष्ट्र व गुजरात सरकार यांनी धरणाचे गेट बंद करण्याचा अन्यायकारी व बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानेही शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन बाकी असताना धरणाचे गेट लावण्यास आमची काही हरकत नसल्याचे नोंदवले आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ाचा पूर्ण बोजवारा नर्मदा विकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने उडवला आहे. या सर्व अन्यायकारी व बेकायदेशीर बुडितांच्या विरोधात मेधा पाटकर व नर्मदा खो:यातील विस्थापित अनिश्चितकालीन उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. केंद्र सरकारसह मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ सोमवारी चिखली पुनर्वसन व रेवानगर येथील प्रकल्पबाधितांनी ‘चुली बंद’ आंदोलन करून मेधा पाटकर व विस्थापितांच्या उपोषणाला पाठींबा दिला.

नर्मदा किना:यावरील मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी व बामणी या गावांना तहसीलदार नितीनकुमार देवरे, नर्मदा विभागाचे उपअभियंता माळसे, शाखा अभियंता मुठाळ, पोलीस उपनिरीक्षक भोसले, तलाठी गजानन पवार व राज्य आपत्ती दलाचे (एसडीआरएफ) जवान यांनी वरील गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. सध्या सरदार सरोवरची पाण्याची पातळी 134.64 मीटर झाली असून तलांक रेषेखालील अतिक्रमण करून राहणा:या नागरिकांना प्रशासनातर्फे नोटिसा देण्यात आल्या. त्यांना लवकरात लवकर नर्मदा विभागाने बांधलेल्या शेडमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या.