शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा काठच्या स्थानिकांना डावलून विकास नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पर्यटनाच्या नावाखाली स्थानिकांना ढावलून परस्पर होणा:या नियोजनाला विरोध राहणार असल्याचे नर्मदा बचाओ आंदोलनाने स्पष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पर्यटनाच्या नावाखाली स्थानिकांना ढावलून परस्पर होणा:या नियोजनाला विरोध राहणार असल्याचे नर्मदा बचाओ आंदोलनाने स्पष्ट केले आहे. याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गुजरातच्या वर्तमान पत्रामध्ये मणिबेली बनणार फाईव्ह स्टार व्हिलेज अशा आशयाची बातमी वाचण्यात आली. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उच्च अधिका:यांसमवेत केवडीय कॉलनी येथे बैठक झाली. 18 डिसेंबरला काढलेल्या मोर्चात जिल्हाधिका:यांनी स्थानिकांनीच पुढाकार घ्यावा असे सांगितले असता अशा बातम्या येत आहेत. स्थानिकांना अंधारात ठेवून बाहेरच्यांना अतिक्रमणास चालना देण्याचेच नियोजन शासनाचे दिसून येत आहे. आमचे क्षेत्र पेसा अंतर्गत येते. त्यात स्थानिकांचा सहभाग, ग्रामसभेची मंजुरीशिवाय कोणतेही कार्य हे बेकायदेशीर असेल. स्वातंत्र्याच्या 78 वर्षात  मणिबेलीर्पयत रस्ता पोहचलेला  नाही. वीज नाही, आरोग्य यंत्रणा सुरळीत नाही. वेळेवर रोजगार नाही. बेरोजगार भत्ता मागण्याची पाळी येते. ती देखील महिनोंमहिने पुर्ण होत नाही. त्यामुळे आधी याचे नियोजन झाले पाहिजे.मणिबेलीसह भादलर्पयत सर्व 33 गावांचे सामुहिक वनअधिकार मंजुर केले पाहिजे. 33 गावांमध्ये पर्यटन असो वा कुठल्याही विकासाचे नियोजन करायचे असल्यास स्थानिकांच्या सहभागाशिवाय करू नये. 33 गावातील जल, जंगल, जमिनीवर व मासळीवर आमचाच हक्क राहील. बाहेरच्या लोकांचा मुळ गावात शिरकावाला पुर्ण विरोध असेल असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर नुरजी वसावे, सिताराम पाडवी, दिपक वसावे, पुन्या वसावे, गंभीर पाडवी, चेतन साळवे यांच्या सह्या आहेत.