शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा जीवन शाळांच्या बालमहोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा काठावर नर्मदा बचाव आंदोलनातर्फे सुरू असलेल्या नऊ जीवनशाळांच्या बालमहोत्सवाला शुक्रवारपासून जावदे पुनर्वसन वसाहत, ता.शहादा येथे सुरुवात झाली आहे. या शाळांतील 700 विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत.या बालमहोत्सवाचे उद्घाटन छत्तीसगडमधील गांधीवादी कार्यकर्ते हिमांशूकुमार, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, माजी क्रीडामंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, ऊर्जा विशेषज्ञ प्रा.संजय ...

ठळक मुद्दे18 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता समारोप वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा काठावर नर्मदा बचाव आंदोलनातर्फे सुरू असलेल्या नऊ जीवनशाळांच्या बालमहोत्सवाला शुक्रवारपासून जावदे पुनर्वसन वसाहत, ता.शहादा येथे सुरुवात झाली आहे. या शाळांतील 700 विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत.या बालमहोत्सवाचे उद्घाटन छत्तीसगडमधील गांधीवादी कार्यकर्ते हिमांशूकुमार, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, माजी क्रीडामंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, ऊर्जा विशेषज्ञ प्रा.संजय मं.गो., सुनीती, हिमशी सिंह, मीना नाईक यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी बोलताना हिमांशूकुमार यांनी सांगितले की, जल, जमीन आणि जंगल हे ख:या अर्थाने आदिवासींनीच राखले असून त्यावर त्यांचाच अधिकार आहे. विकासाच्या नावावर देशात आदिवासींना देशोधडीला लावण्याचा प्रकार सुरू आहे ही बाब चुकीची आहे. आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जीवनशाळांच्या उपक्रमासंदर्भात माहिती दिली. गेल्या 20 वर्षापासून नर्मदा काठावरील लोकच या जीवनशाळा चालवीत आहेत. गावातील लोकांना कुठल्या प्रकारचे शिक्षण हवे, त्याचे स्वरुप कसे असावे ते ठरविण्याचा अधिकार गावक:यांना असावा, असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी जीवनशाळा या ख:या अर्थाने नर्मदा बचाव आंदोलनाची ओळख असून आदिवासींचे ते खरे भविष्य आहे. त्यातूनच आदिवासी विद्याथ्र्याचे भविष्य उज्वल असल्याचे ते म्हणाले.पहिल्या दिवशी उद्घाटनीय सत्रानंतर कबड्डी, खो-खो, तिरकामठा याबरोबरच वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धाही झाल्या. त्यात जीवनशाळांतील विद्याथ्र्यानी आपले नैपुण्य दाखवले. याठिकाणी विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. ढोल-ताशांच्या निनादात या स्पर्धा उत्साहात सुरू आहेत. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम झाला. दरम्यान, या मेळाव्याचा 18 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता समारोप होणार आहे.