लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार: तीन राज्यातून वाहणा:या नर्मदा नदीवर केवडीया येथे सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे काठावरील नागरिकांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी नदीकाठाचा सटेलाईटद्वारे सव्र्हेक्षण करण्यात येणार आहे. सरदार सरोवर हे प्रकल्प तीन लाख 76 हजार 904 हेक्टर जमिनीवर उभारण्यात आले आहे. त्यामुळे 245 खेडी बुडीताखाली आली. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 33 गावांचा देखील समावेश आहे. त्यात धडगाव तालुक्यातील पौला, अट्टी, पिंपळचौप, शेलगदा, केली, थुवाणी, चिंचखेडी, भरड, शिक्का, रोषमाळ खु., डोमखेडी, निमगव्हाण, सुरुंग, शेलडा, जुनवणे, खर्डी, माळ, बिलगाव, साव:यादिगर, भुषा, वरवाली, सादरी, उडद्या, भादल तर अक्कलकुवा तालक्यातील माणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, गमण, सिंदुरी, बामणी, मुखडी, डनेल, मांडवा या गावांचा समावेश आहे. बाधीत गावांमधील नागरिकांचे शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यांमध्ये पुनसर्वसन करण्यात आले असले तरी काही बाधीतांचे स्थलांतर अथवा पुनर्वसन झाले नाही. प्रकल्पाची वाढीव उंची व पावसामुळे बाधीतांच्या समस्यांमध्ये पुन्हा भर पडते, ही बाब लक्षात घेत बाधीतांच्या मदतीसाठी नर्मदा विकास विभागामार्फत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. या व्यवस्थेत अधिका:यांवर विविध जबाबदा:या सोपवली. तर माणिबेली, चिमलखेडी, बामणी, पिंपळचौप व केवडीया आदी पाच ठिकाणी मदत केंद्रेही तयार करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर बाधितांच्या मदतीसाठी स्वतंत्र अधिकारीही नेमण्यात आले. या अधिका:यांमार्फत बाधितांना पुराची पूर्वसूचना देण्यात येत आहे. तर पुराची व्याप्ती, पुरपातळी, मध्यप्रदेशात होणा:या दैनंदिन पर्जन्यमान याची अद्ययावत माहिती नंदुरबार जिल्हा प्रशानाला मिळत आहे.पाचही केंद्रांवर 15 जूनपासून ते 30 ऑक्टोबर्पयत दर 15 दिवसांसाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहे. या कर्मचा:यांच्या माध्यमातून येणा:या माहितीच्या आधारे नर्मदा नदीकाठाची संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रय} करीत आहे. परंतु प्रतिकुल भौगोलीक परिस्थितीमुळे काठावरील वास्तव नेमकी जाणून घेता येत नाही, त्यामुळे येत्या चार दिवसात सटेलाईटद्वारे सव्र्हेक्षण करण्यात येणार आहे. यातून किती शेत-जमिनी व घरे बाधीत झाली, याची इत्यंभूत माहिती प्रशासनाला मिळणार आहे.
नर्मदा नदीही सातपुडय़ातच उगम पावत असली तरी तिचे खोरे विंध्यपर्वतातही आहे. सातपुडय़ातील नर्मदेच्या खो:यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यांचा भाग येतो. नर्मदेला मिळणा:या नंदुरबार जिल्ह्यातील उपनद्यांमध्ये उदय, देवानंद या प्रमुख नद्या आहे. या दोन्ही नद्यांचे उगम डाब ता.अक्कलकुवा येथे होत असून त्या धडगाव-मोलगी परिसरातील सर्वात मोठय़ा नद्या आहे. यापैकी उदय नदी ही बिलगाव ता.धडगाव येथे नर्मदेला मिळते, तर देवानंद ही चिंचखेडी येथे नर्मदेला मिळत आहे.