शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र डिजीटल होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 12:37 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दूरदर्शनची कमी दाबाची सहप्रक्षेपण केंद्र बंद होत असतांना दुसरीकडे नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणच्या सहप्रक्षेपण केंद्राला हायपॉवर करण्यात येणार आहे.  यामुळे एकाचवेळी पाच चॅनेल प्रक्षेपीत होणार असून एफ.एम.आकाशवाणी केंद्राचेही प्रक्षेपण त्याद्वारे होणार आहे. मात्र, त्यासाठी जागेची अडचण असून जिल्हास्तरावर तातडीने जागेचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे.जिल्ह्यात ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दूरदर्शनची कमी दाबाची सहप्रक्षेपण केंद्र बंद होत असतांना दुसरीकडे नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणच्या सहप्रक्षेपण केंद्राला हायपॉवर करण्यात येणार आहे.  यामुळे एकाचवेळी पाच चॅनेल प्रक्षेपीत होणार असून एफ.एम.आकाशवाणी केंद्राचेही प्रक्षेपण त्याद्वारे होणार आहे. मात्र, त्यासाठी जागेची अडचण असून जिल्हास्तरावर तातडीने जागेचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे.जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा, नवापूर व धडगाव येथे दूरदर्शनची सहप्रक्षेपण केंद्र आहेत. याशिवाय खान्देशात अर्थात जळगाव कार्यक्षेत्रात जळगाव, अमळनेर, शिरपूर, पिंपळनेर, धुळे ही सहप्रक्षेपण केंद्र आहेत. नवापूर, पिंपळनेर, अमळनेर, रावेर ही सहप्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याउलट नंदुरबार केंद्राची क्षमता वाढविणे, त्याचे डिजीटलायङोशन करणे, तेथूनच एफ.एम.केंद्र सुरू करणे आदी प्रस्तावीत आहे. परंतु जागेचा प्रश्न कायम आहे.80 च्या दशकात सुरूनंदुरबारात 80 च्या दशकात दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र नंदुरबारसह शहादा व नवापूर येथे सुरू करण्यात आले होते. नंदुरबारातील केंद्र 31 ऑक्टोबर 1989 रोजी सुरू करण्यात आले. धडगाव येथे 90 च्या दशकात लघु प्रक्षेपण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले होते. त्या काळी केवळ दूरदर्शनच्या लघु प्रक्षेपण केंद्रातूनच दूरदर्शनचे एकच राष्ट्रीय व काही कालावधीनंतर प्रादेशिक चॅनेल सहक्षेपीत करण्यात येत होते. त्यासाठी अॅण्टेणा लावावा लागत होता. परंतु 90 च्या दशकात केबलद्वारे विविध दूरचित्रवाणी चॅनेल प्रक्षेपीत करण्यात येऊ लागल्याने हळू हळू दूरदर्शची क्रेझ कमी होऊ लागली. नंतरच्या काळात डीटीएच ने तर दूरदर्शनच हद्दपार करून टाकले. गेल्या दहा ते 15 वर्षापासून ही केंद्रे रखड-रखडतच सुरू होती.नंदुरबारचे केंद्र डिजीटल नंदुरबारात असलेले दूरदर्शनचे लघु प्रक्षेपण केंद्र हे शहरातील खोडाई माता रस्त्यावरील भाडय़ाच्या इमारतीत सुरू आहे. सध्या असलेली जागा अतिशय तोकडी आहे. या केंद्राचे आता डिजीटलायङोशन करण्यात येणार आहे. नवीन मशिनरींच्या माध्यमातून एकाच वेळी दूरदर्शनची पाच चॅनेल सहक्षेपीत होणार आहेत. त्यात राष्र्टीय चॅनेलसह न्यूज, प्रादेशिक, लोकसभा आणि स्पोर्ट चॅनेलचा समावेश राहणार आहे. सध्या या लघु प्रक्षेपण केंद्राची क्षमता केवळ 100 व्ॉट असून नवीन क्षमतेत ते 10 के.व्ही.चे होणार आहे. त्याद्वारे जिल्हाभर त्याची रेंज राहणार आहे. याशिवाय स्मार्ट मोबाईलला विशिष्ट उपकरण लावल्यावर ऑफलाईनही ही पाच चॅनेल नागरिकांना मोबाईलवर पहाता येणार आहेत. सध्या लघुप्रक्षेपण केंद्रातून दिवसभर राष्ट्रीय चॅनेलचे तर दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत प्रादेशिक चॅनेलचे सहक्षेपण केले जाते. एफ.एम.ही सुरू होणारकेंद्र शासनाच्या धोरणानुसार तीन फेजनुसार अर्थात महानगर, महापालिका क्षेत्र असलेले शहरे आणि नंतर फेज तीन मध्ये इतर शहरांमध्ये एफएम केंद्र सुरू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार फेज तीन मध्ये नंदुरबारात एफएम केंद्र सुरू होणार आहे. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. दूरदर्शनच्या याच लघुप्रक्षेपण केंद्रातून एफ.एम.चेही सहक्षेपण होणार आहे. यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांनी दोन वर्षापासून प्रय} सुरू केले आहेत.शहादा, धडगावही बंद होईलनंदुरबार केंद्राची क्षमता वाढल्यानंतर ते संपुर्ण जिल्हा कव्हर करणार आहे. त्यामुळे शहादा व धडगाव ही लघुप्रक्षेपण केंद्रही पुढील काळात बंद होऊ शकतील अशी शक्यता आहे.जागेची अडचणनंदुरबारचे सध्याचे केंद्र हे कमी जागेत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. नवीन व उच्च क्षमतेचे केंद्र सुरू करण्यासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी प्रसार भारतीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे जागेचीही मागणी करण्यात आली असल्याचे समजते. परंतु ती अडचण अद्याप दूर झालेली नाही. जागा मिळताच नवीन उच्च क्षमतेच्या लघु प्रक्षेपण केंद्राचे काम लागलीच सुरू होण्याची शक्यता आहे.