शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘दगड’ उचलण्याची नंदुरबारातील प्रथा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:19 IST

सालदार ठेवण्याऐवजी आता रोख रक्कमेचे बक्षीस

मनोज शेलार लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे ‘सालदार’की आता कालबाह्य ठरली आहे. परंतु पूर्वी अक्षय तृतीयेला सालदार ठरवितांना जी पद्धत व परंपरा होती ती येथील माळीवाडय़ात आजही कायम आहे. ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम..’ म्हणत जो जास्त वजनाचा दगड उचलेल त्याला सालदार ठेवले जात होते आता केवळ  रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.खान्देशात पूर्वी अक्षय तृतीयेला सालदारांची नेमणूक केली जात होती. पूर्वी शेतीतील यांत्रिकीकरण नव्हते, त्यामुळे केवळ मणुष्यबळावरच शेतीची कामे अवलंबून राहत होती. त्यामुळे सालदारांना मोठी मागणी राहत होती. वर्षाचे ठराविक पैसे देवून, धान्य व कपडे देवून त्याची राहण्याची व्यवस्था शेतक:याकडे करावी लागत होती. सालदार ठरवितांना अनेक प्रथा व परंपरा होत्या. त्यातीलच एक नंदुरबारातील माळीवाडय़ातील ‘दगड उचलण्याची’ प्रथा होय. माळीवाडय़ातील सार्वजनिक चौकात अक्षय तृतीयेला पूर्वी पहाटेपासूनच ही स्पर्धा सुरू होत होती. त्यासाठी पंचक्रोशीतील अनेकजण उपस्थित राहत होते. एक क्विंटलपासून पाच क्विंटलर्पयत वजनाचा दगड एका दमात उचलून तो खांद्यावर ठेवण्याची ही स्पर्धा राहत होती. जो व्यक्ती एका दमात दगड उचलत होता. त्याला सालदार म्हणून ठेवण्यासाठी शेतक:यांमध्येही स्पर्धा लागत होती. अशावेळी जास्तीत जास्त पैसा जो देईल त्या शेतक:याला असे सालदार पसंती देत होते.आता ही परंपरा कालबाह्य ठरली असली तरी त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला ही स्पर्धा घेतली जाते. आता सालदार न ठेवता एका दमात जो दगड उचलेल त्याला रोख रक्कम म्हणून बक्षीस दिले जाते. बुधवारी देखील सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणावर या स्पर्धेसाठी गर्दी झाली होती. जास्तीत जास्त एक क्विंटलर्पयत दगड उचलण्यात यावेळी यश आले. यावेळी संतोष माळी, दिनेश ठाकरे, भैय्या ठाकरे यांना रोख बक्षीसे देण्यात आली. यावेळी माणिक माळी, पंडित माळी, जगन माळी, शिवाजी माळी, भाईदास माळी, धनराज माळी, सुकदेव माळी आदी उपस्थित होते.