शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या एफ.एम.केंद्रासाठी निविदाच येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:36 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकाशवाणीतर्फे सुरू करण्यात येणा:या एफ.एम.रेडिओ केंद्रासाठी निविदा भरण्यास कुणीही उत्सूक नसल्याने फेज थ्री मधील येथील केंद्र रद्द झाले आहे. आता पुन्हा प्रक्रिया राबविण्यासाठी अर्थात फेज थ्री ची पोझीशन येण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी जावू द्यावा लागणार आहे. दरम्यान, कम्युनिटी रेडिओ केंद्राअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे केंद्र ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकाशवाणीतर्फे सुरू करण्यात येणा:या एफ.एम.रेडिओ केंद्रासाठी निविदा भरण्यास कुणीही उत्सूक नसल्याने फेज थ्री मधील येथील केंद्र रद्द झाले आहे. आता पुन्हा प्रक्रिया राबविण्यासाठी अर्थात फेज थ्री ची पोझीशन येण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी जावू द्यावा लागणार आहे. दरम्यान, कम्युनिटी रेडिओ केंद्राअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे केंद्र येत्या तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.नंदुरबारला एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. परंतु केंद्र सरकारच्या माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाच्या शहरांच्या वर्गीकरणानुसार नंदुरबार शहर हे फेज थ्री मध्ये येते. त्यामुळे फेज एक व दोन नंतर थ्री च्या शहरांमध्ये एफ.एम.केंद्र सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येते. त्यानुसार नंदुरबार व इतर शहरांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. निविदाही काढण्यात आल्या. परंतु नंदुरबारसाठी कुणीही निविदा न भरल्याने येथील एफ.एम.रेडिओ केंद्र जवळपास रद्द झाले आहे. आता केवळ कम्युनिटी रेडिओचाच मार्ग तेवढा मोकळा राहणार आहे.अनेक वर्षापासूनची मागणीनंदुरबारात एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू करावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत होती. त्याअंतर्गत याआधीचे खासदार माणिकराव गावीत आणि विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी देखील पाठपुरावा केला होता. त्यानुसार नंदुरबारचा समावेश हा शहरांच्या वर्गवारीनुसार तिस:या यादीत करण्यात आला होता. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी देशपातळीवर नंदुरबारसह देशातील इतर शहरांच्या एफ.एम.केंद्रासाठी माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाने निविदाही प्रसिद्ध केली होती. परंतु नंदुरबारसह देशातील 17 शहरांच्या एफ.एम.केंद्रांसाठी कुणीही निविदा भरल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.उत्पन्नाचे स्त्रोत नाहीनंदुरबारला खाजगी एफ.एम.रेडिओ केंद्र जरी सुरू झाले तरी त्यातून मिळणारा महसूल अगदीच अल्प राहणार आहे. त्यामुळे संबधित खाजगी कंपनीला ते परवडणार नाही. ही बाब गृहित धरूनच नंदुरबारच्या केंद्रासाठी कुणी फारशी उत्सूकता दाखविली नसल्याचे समजते. याशिवाय जिल्ह्याची भौगोलिक रचना देखील द:याखो:यांची असल्यामुळे सर्वच भागात रेडिओ लहरी पोहचतीलच असे नाही. तो देखील विचार करण्यात आल्याचे समजते.एफ.एम.रिले केंद्रासाठी प्रय}दूरदर्शनचे नंदुरबार आणि शहादा ही दोन सहक्षेपण केंद्र ही लवकरच डिजीटल होणार आहेत. त्यामुळे या केंद्रांवरूनच आकाशवाणीचे  इतर एफ.एम.रेडिओंचे सहसक्षेपण होणार आहे. या माध्यमातून थेट मोबाईलवरही रेडिओ ट्रांन्झीस्टरसारखे एफ.एम.ऐकता येणार आहे. नंदुरबारच्या दूरदर्शन सहक्षेपण केंद्रासाठी शासकीय जागेचा प्रस्ताव पडून आहे. शासकीय जागा उपलब्ध झाल्यास डिजीटल केंद्राचे काम सुरू होऊ शकणार आहे.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणा:या निधीतून येथील कृषी विज्ञान केंद्रात कम्युनिटी रेडिओ केंद्राला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी 76 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. केंद्रीय माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयात विविध पातळीवरील तीन मंजु:या मिळाल्या असून अंतिम दोन मंजुरींची फाईल देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार महिन्यात कृषी विज्ञान केंद्राचे कन्युनिटी एम.एम.रेडिओ केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कृषी विज्ञान केंद्रात आधीच सर्व इन्फास्ट्रर उपलब्ध आहे. त्यामुळे फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही. या केंद्राच्या माध्यमातून कार्यक्रमाचा, प्रेक्षपणाचा आणि कर्मचा:यांसह इतर खर्च पहिल्या तीन वर्षाकरीता केंद्र सरकार देणार आहे. त्यानंतर मात्र स्थानिक उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थात जाहिरात आणि प्रायोजकांच्या माध्यमातून मिळणा:या महसुलातून खर्च भागवावा लागणार आहे.या रेडिओ केंद्राची प्रेक्षपण क्षमता सुरुवातीला केवळ 15 किलोमिटर अंतराची राहणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.कम्युनिटी रेडिओसाठी शासनाचे प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. यासाठी केंद्र शासन जवळपास अडीच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देखील करते. साधारणत: दहा लाखात असे केंद्र उभे राहू शकते.  पाच वर्षाचे लायसन्स केंद्र सरकार त्यासाठी देते. याची रेंज केवळ 15 किलोमिटरची असते. वैयक्तिक किंवा समुहाच्या माध्यमातूनही ते सुरू करता येऊ शकते.