शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील वेडसर ‘विरू’ने आणले सर्वानाच जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शोले चित्रपटातील विरू स्टाईल स्टंट करणा:या एका वेडसर युवकाने नागरिकांसह पोलिसांना चांगलेच जेरीस आणल्याची घटना रविवारी दुपारी महाराष्ट्र व्यायाम शाळा चौकात घडली. अखेर झाडावरून खाली पडल्याने वेडसर युवक पोलिसांच्या हाती लागला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास कडकडीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शोले चित्रपटातील विरू स्टाईल स्टंट करणा:या एका वेडसर युवकाने नागरिकांसह पोलिसांना चांगलेच जेरीस आणल्याची घटना रविवारी दुपारी महाराष्ट्र व्यायाम शाळा चौकात घडली. अखेर झाडावरून खाली पडल्याने वेडसर युवक पोलिसांच्या हाती लागला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास कडकडीत ऊन पडले होते. सुटीचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात फारशी वर्दळही नव्हती. ती संधी साधत परिसरात फिरणारा एक वेडसर तरुण थेट पिंपळाच्या झाडावर थेट शेंडय़ार्पयत चढला. चढून तर गेला, परंतु त्याला उतरता येत नसल्यामुळे तो ओरडू लागला. त्यामुळे नागरिकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. बारीक  फांद्यावर जावून तो कधी लोंबकळू लागला तर कधी पडण्याचा बहाणा करू लागला. एव्हाना त्या परिसरात गर्दी जमली. नागरिकांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले. परंतु   त्याला उतरता येत नसल्यामुळे तो अडकला. काहींनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीही त्याला खाली उतरविण्यासाठी प्रय} सुरू केले. काही युवकही झाडावर आणि परिसरातील घरांवर चढून त्याला खाली येण्यास सांगत होते. परंतु काहीही उपयोग होत नव्हता. खाली पडीत घरे आणि सॉ-मिल होती.     सॉ-मिलच्या लाकडांमध्ये पडला तर त्याला गंभीर ईजा होण्याची      शक्यता होती. अशा वेळी सर्वजण आपल्या परिने प्रय} करू लागले. अशातच त्याचा तोल जावून तो एका पडक्या कौलारू छताच्या घरावर पडला. छत तोडून तो थेट खाली पडला. घराचे दरवाजे बंद असल्यामुळे पुन्हा तो कसेतरी करून छतावर चढला. गर्दी आणि पोलीस पाहून तो खाली उतरून पळू लागला असता जवळच असलेल्या हातपंपाजवळ पुन्हा तो पडला. ती संधी साधून नागरिकांनी त्याला पकडले. त्याला ब:याच ठिकाणी खरचटले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.या प्रकारामुळे मात्र, एक ते दीड तास नागरिकांची आणि   पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.