याप्रसंगी काही विद्यार्थी , भुगोलप्रेमी यांनी हा अनुभव घेवुन निरीक्षण केले त्यासाठी मंडळाने काही उपकरणाची निर्मिती केली होती व त्याव्दारे निरीक्षणे नोदविली. त्यात उत्तरायण दक्षिणायनचे मॉडेल, पृथ्वीच्या कललेल्या आसाचे मॉडेल, सोलर डायल, डच पध्दतीचे सोलर डायल व बीम वर ठेवलेले सोलर डायल, अशा तीन पद्धतीच्या सोलर डायल व विविध मॉडेलच्या विविध वैज्ञानिक पध्दतीने हा प्रसंग अनुभवता आला. यावेळी नक्षत्र छंद मंडळाच्या समन्वयक तथा खगोल अभ्यासक चेतना पाटील, आशापुरी माता फाउंडेशनचे संस्थापक दिनेश पाटील, निलेश सूर्यवंशी, हेमंत अहिरे , मुख्याध्यापक पुरूषोत्तम शिंदे, वर्षा शिंदे, आर्या पाटील, दिशा पाटील, अर्णव पाटील, दर्शन सूर्यवंशी, कल्याणी सूर्यवंशी, अपूर्व शिंदे , रिदम अहिरे आदी होते.
नंदुरबारकरांनी अनुभवला शुन्य सावली दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST