शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा पळवल्याच्या संशयातून नंदुरबारात ‘पित्याला’ही बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्यधुंद व्यक्तीसोबत असलेला चिमुकला रडत असल्याचे पाहून संशय बळावल्याने नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े चौकशीअंती मद्यपी ‘त्या’ चिमुकल्याचा पिता असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालकाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आल़े    साक्रीनाका परिसरात रविवारी दुपारी 1 वाजेच्या सहा वर्षीय बालक रडत असल्याचे काहींना दिसून आला़ त्याच्याजवळची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्यधुंद व्यक्तीसोबत असलेला चिमुकला रडत असल्याचे पाहून संशय बळावल्याने नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े चौकशीअंती मद्यपी ‘त्या’ चिमुकल्याचा पिता असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालकाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आल़े    साक्रीनाका परिसरात रविवारी दुपारी 1 वाजेच्या सहा वर्षीय बालक रडत असल्याचे काहींना दिसून आला़ त्याच्याजवळची व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर लोळत असल्याने काहींनी बालकाची चौकशी केली़ परंतू बालकाला उत्तर देता आले नाही़ यात संबधित हा मुले पळवणारा असल्याचा संशय घेत मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी गर्दी जमा झाली़ यातून पोलीसांना माहिती दिल्यानंतर नजीकच्या चौकीतून पोलीस कर्मचा:यांनी हजेरी लावत दोघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल़े चौकशीनंतर संबधित व्यक्ती हा मुलाचा पिता असल्याची माहिती समोर आली़ संजय भावराव मोरे रा़ साक्री असे निष्पन्न झाल्यावर मुलाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आल़े संजय मोरे यास मद्याचे व्यसन असल्याने पत्नी नवापूर येथे आई-वडीलांकडे वास्तव्यास आह़े या दाम्पत्याला सहा वर्षाचा मुलगा आह़े रविवारी संजय याने नवापूर गाठून मुलाला वह्या पुस्तके घेण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून नवापूर येथून नंदुरबारला आणले होत़े शहरात आल्यानंतर त्याने मद्य प्राशन करून मुलाला वा:यावर सोडल़े पोलीसांनी नवापूर येथे संपर्क करून मुलाच्या आईला बोलावल्यानंतर ते तात्काळ नंदुरबारला आल़े संजय मोरे यास पोलीसांनी समज देऊन साक्री येथे पाठवून दिल्याची माहिती आह़े प्रकाशा येथे अफवेमुळे जागरण      प्रकाशा ता़ शहादा येथे मुले पकडणा:या टोळीतील दोन महिला फिरत असल्याची अफवा पसरल्याने त्यांचा शोध घेत पोलीस आणि नागरिक रात्रभर गावात फिरत होत़े संपूर्ण गाव पिंजून काढल्यानंतरही अज्ञात दोन महिला मात्र मिळून आल्या नाहीत़ शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास प्रकाशा गावातील तापी काठालगतच्या मच्छीबाजार, कोळीवाडा, कुंभारवाडा, नवा प्लॉट, मुंजडा हाटी या परिसरात रात्री 10़ 30 एक महिला आणि मुलीला दोन पुरूष साडी घालत असल्याचे दिसून आल़े त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली़ ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल गौतम बोराळे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत परिसरात ‘त्या दोघींचा’ शोध सुरू केला़ संगमेश्वर मंदीर परिसर, कुंभारवाडा, तापी नदी काठासह संपूर्ण परिसरात शोध घेतला़ परंतू संशयित महिला आढळून आल्या नाहीत़ पहाटेर्पयत ग्रामस्थ आणि पोलीस दोघा महिलांचा शोध घेत असल्याची माहिती आह़े घटनेची प्रकाशासह शहादा तालुक्यात रविवारी सकाळपासून एकच चर्चा सुरू होती़ नागरिकांनी अफवांना बळी पडू नये- पोलीस अधिक्षक  काही दिवसांपासून आपल्या जिल्ह्यात ,शेजारील जिल्ह्यात व राज्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबत समाजकंटकाकडून अफवा पसरवली जात आहे. यातून काही ठिकाणी कोणतीही शहानिशा न करता निरपराध इसमांवर हल्ले होऊन वाहनांची जाळपोळ, मारहाण करून  लोकांना मारुन टाकण्यापयर्ंतच्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये सदर इसम निरपराध, कामा निमित्ताने आलेले निष्पन्न होवून हल्लेखोर इसमांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. परंतू अशा प्रकारची कुठलीही टोळी कार्यरत नसून लहान मुले पळविण्याची एकही घटना जिल्ह्यात किंवा शेजारील जिल्ह्यात घडलेली नाही किंवा पोलीसात तशी नोंद नाही. अशा प्रकारच्या अफवा काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. जनतेने अफवांना बळी न पडता शंका आल्यास पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांना सुचित करावे. अशा अफवा पसरवणे किवा फॉरवर्ड करणे हा गुन्हा असल्याचे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी कळवले आह़े