शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नंदुरबारातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 11:26 IST

‘विरचक’मध्ये 37 टक्के पाणीसाठा : गेल्या आठवडय़ातील अतीवृष्टीचा परिणाम

नंदुरबार : शिवण नदीच्या उगम क्षेत्रात गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे विरचक प्रकल्पातील पाणी पातळी थेट 19 टक्क्यांनी वाढली आहे. सद्य स्थितीत प्रकल्पात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजूनही शिवण नदीचा प्रवाह आणि नदीला येवून मिळणा:या विविध नाल्यांचा प्रवाह सुरूच असल्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. यामुळे नंदुरबारकरांवरील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे. पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरी विरचक प्रकल्पातील पाणी पातळीत थेंबभरही वाढ झालेली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठा कमालीचा घडला होता. 15 ऑगस्टर्पयत केवळ 19 टक्के पाणीसाठा होता. उपयुक्त पाणी साठय़ाची टक्केवारी केवळ 12 टक्के होती. त्यामुळे पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. येत्या 1 सप्टेंबरपासून पाणी कपातीचा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पालिकेने ठरविलेही होते. परंतु नंदुरबारकरांच्या सुदैवाने गेल्या आठवडय़ात शिवण नदीच्या उगम क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे संकट तुर्तास टळले आहे.पाणीसाठा 37 टक्क्यांवरविरचक प्रकल्पात सद्य स्थितीत 37 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह लक्षात घेता आणखी दोन दिवसात साठा 40 टक्केपेक्षा अधीक जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात पाणीसाठा 34 टक्केर्पयत होता. सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस यामुळे धरणातील पाणीसाठा 70 टक्केपेक्षा अधीक गेला होता. यंदा देखील सप्टेंबर आणि परतीचा पाऊस चांगला झाला तर पाणीसाठा गेल्यावर्षाइतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी पालिकेने पाणी कपातीचा विषय बाजुला ठेवला असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितले.पाण्याची वेळ जैसेथे पाणी पुरवठय़ाची सध्याची वेळ कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येतो. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आणि योग्य आहे. 1 सप्टेंबरपासून किमान 20 ते 25 मिनिटांनी पाणी पुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागले असते. पावसाळ्यात ही स्थिती राहिली असती तर हिवाळा आणि उन्हाळ्यातील स्थिती आणखी त्रासदायक राहिली असती. सुदैवाने नंदुरबारकरांवरील हे संकट तुर्तास टळले आहे.पदाधिकारी, अधिका:यांकडून पहाणीविरचक प्रकल्पातील वाढलेला पाणीसाठय़ाची पहाणी पालिकेच्या पदाधिका:यांनी व अधिका:यांनी केली. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार नदीचा प्रवाह आणखी आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळ आणि दीड ते दोन फुटांनी वाढणार आहे. अर्थात याच गतीने नदीतील पाणी वाहत राहिल्यास प्रकल्पातील पाणीसाठा 40 टक्केपेक्षा अधीक जाणार आहे.तीन वर्षापूर्वी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण पावसाळा संपुनही विरचक प्रकल्पात एक टक्काही पाणी पातळी वाढली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने प्रकल्पाला जिवदान दिले होते. परतीचा पाऊस दोन दिवसातच सरासरीचा 20 ते 25 टक्के पडून गेल्याने विरचक प्रकल्पातील पाणी पातळी थेट आठ टक्क्यावरून 41 टक्क्यांवर गेली होती. पाणी टंचाईचे टळलेल्या संकटामुळे त्यावेळी पालिकेने पालिका कार्यालयातच सार्वजनिक सत्यनारायण पुजेचेही आयोजन केले होते. ती आठवण यावेळी पुन्हा आली.आंबेबाराही भरण्याच्या मार्गावरनंदुरबार शहराला आंबेबारा प्रकल्पातून देखील पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पात देखील केवळ 20 टक्के पाणीसाठा होता. गेल्या आठवडय़ातील पावसामुळे हा प्रकल्पही 60 टक्केपेक्षा अधीक भरला आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस राहिल्यास हा प्रकल्प दरवर्षाप्रमाणे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील 50 टक्के पाणीसाठा शहरासाठी आरक्षीत केला जातो. तेथून नदीद्वारे पाणी आणून ते आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून तेथून ते पाईपलाईनीने शहरात आणले जाते. हा प्रकल्पही पुर्णपणे भरत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.