शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विकसनशील शहरांमध्ये नंदुरबार राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील एक स्मार्ट शहर म्हणून नंदुरबार नावारूपास आले आहे.  समर्पित भावनेने काम केल्यावरच हे शक्य होते, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंदुरबारात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले.     ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील एक स्मार्ट शहर म्हणून नंदुरबार नावारूपास आले आहे.  समर्पित भावनेने काम केल्यावरच हे शक्य होते, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंदुरबारात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले.         नंदुरबार पालिकेतर्फे उभारण्यात आलेले दादासाहेब बटेसिंह रघुवंशी  उद्यान, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम  ई-लायब्ररी, आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन व सुवर्ण जयंती रोजगार योजनेअंतर्गत बचत गट व महिलांना विविध वस्तूंचे वाटप राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाशेजारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी  माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत, माजीमंत्री आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, आमदार काशीराम पावरा, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, शिरपूरचे नगराध्यक्ष भुपेश पटेल, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पंचायत समिती सभापती रंजना नाईक,  जि.प. चे माजी अध्यक्ष भरत गावीत, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राजकारण करताना समर्पित भावनेने काम केले पाहिजे. माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांची काम करण्याची पद्धत तीच होती. तीच परंपरा आमदार चंद्रकांत रघुवंशी हे चालवित आहेत. शहर विकासाच्या योजना राबवितांना सामान्य घटक डोळ्यासमोर ठेवला गेला पाहिजे. नागरी सुविधा देतांना शहराचा विकास आणि बेरोजगार हातांना काम कसे मिळेल हे देखील पाहिले पाहिजे. नंदुरबार पालिकेतर्फे ते पाहिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी १८ टक्के असलेला वेग आता ५२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे शहर विकास आणि मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे. सध्या राजकारणाचा धंदा झाला आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कुठून काय आणि कसे मिळेल यावरच डोळा राहत आहे. त्यामुळे चांगली पिढी राजकारणात आली पाहिजे, अशी अपेक्षाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेने केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आपण गेल्या निवडणुकीत दिलेले सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. नंदुरबारात काय आहे असे विचारण्यापेक्षा काय नाही असे विचारले जाते. येत्या काळात गरीब, सर्वसामान्यांसाठी औषधालय सुरू करण्याचा मानस आहे. त्यात २५ ते ३० टक्के कमी दराने औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या अत्यल्प शुल्कात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्यातील एक आदर्श शहर बनविण्याचा आपला संकल्प असून तो पूर्णत्वास येत असल्याचा आनंद असल्याचेही आमदार रघुवंशी यांनी सांगितले.सूत्रसंचालन प्रा.डॉ. माधव कदम यांनी केले. या वेळी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा विमलबाई रघुवंशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र मराठे, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, मुख्याधिकारी गणेश गिरी, बाजार समितीचे सभापती भरतभाई पटेल, माजी सभापती डॉ.सयाजी मोरे, शेतकरी संघाचे सभापती बी.के. पाटील, मजूर फेडरेशनचे किरण पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान, सभापती निखिल रघुवंशी, शकुंतला मोहन माळी, वंदना कैलास पाटील, नगरसेवक राजेश परदेशी, निंबा माळी, मोहन माळी, करिश्मा बोरसे, विद्या शिंदे, लीला साळवे, अनिल पाटील, भरत पाटील, बापू पाटील आदी उपस्थित होते.