शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील १७ भाग केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिला कोरोना संसर्गीत रुग्ण सापडल्यानंतर शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली होती. ज्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पहिला कोरोना संसर्गीत रुग्ण सापडल्यानंतर शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली होती. ज्या भागात हा रुग्ण सापडला तो भाग रात्रीच सील करण्यात आला. शिवाय जंतूनाशक फवारणी करून हा भाग सॅनिटाईझ करण्यात आला. दरम्यान, संपुर्ण नंदुरबार शहर लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व व्यवहार बंद होते. सोमवारपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका संशयीत कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तातडीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेवून त्यांचा शोध घेवून त्यांची पहिले आरोग्य तपासणी करीत त्यांना कॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर रुग्ण राहत असलेला भाग तातडीने सील करण्यात आला.साधारणत: एक किलोमिटरचा भाग सील करण्यात येवून रात्रीच या भागात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. पहाटेपर्यंत हे सर्व कामे आरोग्य विभाग, पालिकेचा स्वच्छता विभाग आणि पोलिसांच्या उपस्थित सुरू होता.१७ ठिकाणे केली सीलरुग्ण सापडलेल्या भागासह परिसरातील भाग अर्थात या भागातील रस्ते, गल्लीबोळ असे सर्व १७ भाग सील करण्यात आले. या भागासह परिसरातील एक किलोमिटर परिसरात कुणालाही बाहेर निघण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ दवाखाने, औषधी दुकाने सुरू होती. त्यांच्याततही शुकशुकाट असल्याने ती देखील दुपारनंतर बंद दिसून आली. याशिवाय १४ ठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार हे स्वत: उपस्थित होते.जंतूनाशक फवारणीया परिसरात रात्रीच पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जंतूनाशक अर्थात सोडियम हायपोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी करण्यात आली. त्यात अलीसहाब मोहल्ला, फकिल मोहल्ला, बालाजीवाडा, दखनी गल्ली, मणियार मोहल्ला, बिसमिल्ला चौक, बिफ मार्केट रोड, रज्जाक पार्क, अमिन भैय्या चाळ, चिंचपाडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जूना बैलबाजार या ठिकाणांचा समावेश होता.चौकाचौकात बंदोबस्तविनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी सकाळी सात वाजेपासूनच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. शहरालगतच्या चारही बाजूंच्या चौफुलींवरच शहरात येणारी वाहने अडविण्यात येत होती. त्यामुळे दिवसभर शहरात शुकशुकाट होता. कुणीही बाहेर निघतांना दिसून आले नाही. केवळ पोलिसांची गस्ती वाहने रस्त्यावर दिसून येत होती.घराबाहेर पडू नका...शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्यात येणार असून नागरिकांनी घरातच रहावे. अनावश्यक बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे.नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले आहे.