शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनासाठी नंदुरबारकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 11:40 IST

ढोल-ताशांच्या गजरात नागरिक मंत्रमुग्ध : मुर्तीकारांकडून फिरवला जातोय अंतीम हात

ठळक मुद्दे सजावटीला मागणी गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या गणरायाच्या साज-सजावटीकडे लक्ष देण्यात येत आह़े सध्या लालबागचा राजा व बाजीरावचे रुप असलेल्या गणेशमुर्तीना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यासोबतच पारंपारिक पध्दतीच्या शंकर, श्रीकृष्ण यांच

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विघ्नहर्ता येण्याची चाहूल आता सर्वाना लागली आह़े त्यामुळे नंदुरबार शहरातील मुर्तीकारदेखील गणेशमुर्तीवर अंतीम हात फिरविण्यात मगA आहेत़ गणपती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असल्याने  मुर्तीची ‘फिनिशींग’ करण्यासाठी मुर्तीकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत़ सर्वत्र मोठय़ा गणेशमुर्ती सजविण्याचे त्यांना अलंकार चढविण्याचे काम मुर्तीकार करीत आहेत़25 रोजी गणेश चतुर्थी असल्याने सर्वत्र गणेशभक्तांमध्ये गणरायाचे स्वागत करण्यासाठी लगबग सुरु झाली आह़े शहरातील लहान मुर्ती पूर्ण तयार झाल्या असल्या तरी अद्याप मोठय़ा मुर्तीवर मुर्तीकार अंतीम टप्प्यातील काम करीत आहेत़ जवळपास सत्तर टक्के मुर्तीची कामे पूर्ण झाली आहेत़ उर्वरित दोन दिवसांमध्ये सर्व मुर्ती तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे मुर्तीकांराकडून सांगण्यात आले आह़े शासनाकडून मोठय़ा प्रमाणात शाडुच्या तसेच मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे सांगण्यात येत आह़े याला नंदुरबारातील गणेशभक्तदेखील प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबारातील शाडु मातीच्या मुर्तीचे व्यावसायिक देविदास झवेरी यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पेक्षा यंदा शाडु मातीच्या मुर्ती खरेदीला गणेशभक्तांची पसंती दिसून येत आह़े़ तसे पाहता  प्लॅस्टर ऑफ पॅरीसपेक्षा शाडु मातीच्या मुर्ती महाग असतात़ त्यामुळे बहुतेक गणेशभक्ताकंकडून शाळुच्या मुर्ती खरेदी न करता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच मुर्ती खरेदीकडे प्राधान्य देण्यात येत असत़े परंतु यंदा गणेशभक्तांमध्ये शाडुच्या मुर्ती खरेदीसाठी प्राधान्य देण्यात येत आह़े जवळपास 80 टक्के शाडु मातीच्या मुर्तीची बुकिंग झाली असल्याची माहिती या वेळी झवेरी यांच्याकडून देण्यात आली आह़े येत्या काही दिवसांत ही टक्केवारी अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े पर्यावरणाला महत्व देताना यंदाच्या शाडुच्या गणपतींच्या मुर्ती तयार करतांना अजून एक प्रयोग करण्यात आला आह़े शाडु मातीच्या मुर्ती घडवितांना त्यांच्यात विविध रोपांच्या बिया रुजविण्यात आल्या आह़े जेणे करुन या मुर्तीचे विसजर्न झाल्यावर त्यापासून रोपटे तयार होणार असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे केवळ शाडु मातीचीच मुर्ती नाही तर त्याहून पुढे विचार करीत झाडे लावण्याचाही उद्देश यातून साध्य होणार आह़े शाडु मातीच्या मुर्ती तयार करीत असताना मोठय़ा प्रमाणात मेहनत घ्यावी लागत असल्याचे मुर्तीकारांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय यावर रंग देण्यासाठी खर्चही अधिक येत असल्याने पीओपीच्या मुर्तीच्या तुलनेत याची किंमत अधिक असल्याचे मुर्तीकारांकडून सांगण्यात येत आह़े