शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौथ्या फलाटाचा मार्ग लवकरच मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, रेल्वे गाडय़ांची वाढती संख्या व ताप्ती सेक्शनवरील मध्यवर्ती रेल्वे स्थानक लक्षात घेता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, रेल्वे गाडय़ांची वाढती संख्या व ताप्ती सेक्शनवरील मध्यवर्ती रेल्वे स्थानक लक्षात घेता नंदुरबारात चौथा फ्लॅटफॉर्मचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडून तयार करण्यात येत आहे. त्याला मंजुरी मिळते किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान, रेल्वेगेटच्या बाजुला दुस:या पादचारी पुलाच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण नुकतेच पुर्ण करण्यात आले आहे. दुहेरीकरणाच्या मार्गावरून प्रवासी व मालवाहू गाडय़ा देखील सुरू झाल्या आहेत. पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा उधना-जळगाव हा प्रमुख मार्ग झाल्याने या मार्गावर येत्या काळात गाडय़ांची संख्या देखील वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार या मध्यवर्ती स्थानकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.फ्लॅटफॉर्मची संख्या अपुरीसध्या नंदुरबार स्थानकावर तीन फ्लॅटफार्म आहेत. त्यापैकी दोन फ्लॅटफार्मचा वापर प्रवासी गाडय़ांच्या थांब्यासाठी केला जातो. तिस:या फ्लॅटफार्मचा वापर हा मालगाडी व इतर गाडय़ांसाठी केला जातो. परंतु ज्या वेळी अर्थात दुपारच्या वेळी प्रवासी लोकल आणि फास्ट पॅसेंजर गाडय़ांची वेळ असते त्यावेळी मोठी अडचण होते. त्यामुळे चौथा फ्लॅटफार्म राहिल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. याबाबतची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. परंतु त्याकडे लक्ष देण्यात येत नव्हते. आता दुहेरीकरण झाल्याने या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.तिकीट खिडकीचीही मागणीदुस:या किंवा तिस:या फ्लॅटफार्म वर तिकीट खिडकीची मागणी देखील अनेक दिवसांपासूनची आहे. सध्या एकाच भागात अर्थात रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तिकीट खिडकी आहे. शहराचा दोन भागात विस्तार झालेला असल्यामुळे रेल्वे स्थानकापलिकडील प्रवाशांना दोन किंवा तीन नंबरच्या फ्लॅटफार्मवरून जाणा:या गाडीतून प्रवास करावयाचा असल्यास प्रवाशांना मुख्य स्थानकात यावे लागते. महिला, वयोवृद्ध प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होते. परिणामी प्रवाशांना उड्डाणपुलावरून रेल्वे स्थानकात येवून तिकीट घ्यावे लागते. नंतर पादचारी पुलाने दुस:या किंवा तिस:या फ्लॅटफार्मवर जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी तिकीट खिडकीची मागणी देखील कायम आहे. चौथा फ्लॅटफार्मच्या प्रस्तावासोबत तिकीट खिडकीचाही प्रस्तावाची मागणी करण्यात येत आहे.पादचारी पुलाकडे दुर्लक्षसध्या असलेला पादचारी पूल हा रहिवास वस्तीतून निघतो. या वस्तीत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चारचाकी वाहने अशा वस्तीतून जाऊ शकत नाही. त्यामुळे जुना कोरीट रोड व अलिकडील  बाजूस रेल्वे पोलीस ठाणे असा    नवीन पादचारी पूल तयार केल्यास प्रवाशांना ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय शालेय विद्यार्थी, महिला यांनाही हा पादचारी पूल सोयीचा ठरणार आहे. या पुलाबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आल्यास नेहमीच मागणी केली जाते, परंतु त्याकडे फारसे कुणी लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नवीन पदाचारी पुलाबाबत देखील रेल्वे स्थानकातील फ्लॅटफार्मचा विस्तार करतांना विचारात घ्यावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि त्या अनुषंगाने वाढलेली रहदारी लक्षात घेता चौथा फ्लॅटफार्म, पादचारी पूल आणि दुसरी तिकीट खिडकी याबाबत गांभिर्याने विचार करावा अशी मागणी होत आहे.नंदुरबार रेल्वे स्थानकाला गेल्या आठवडय़ात पश्चिम रेल्वेचे डी.एम.यांनी भेट दिली होती. त्यांनी विविध कामांची पहाणी केली. त्यावेळी त्यांना चौथ्या फलाटाविषयी अवगत करण्यात आले होते. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.नंदुरबार रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस प्रवासी रेल्वे गाडय़ांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रवाशांची वर्दळ देखील वाढली आहे.