शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नंदूरबार रेल्वेस्थानकांने साकारली सांस्कृतिक ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

नंदूरबार रेल्वेस्थानकाचे १८९९ साली इंग्रजांच्या काळात बांधकाम करण्यात आलेे. स्थानकाच्या बांधकामात दगडाचा वापर करण्यात आला आहे. एक शतकाच्या पुढे ...

नंदूरबार रेल्वेस्थानकाचे १८९९ साली इंग्रजांच्या काळात बांधकाम करण्यात आलेे. स्थानकाच्या बांधकामात दगडाचा वापर करण्यात आला आहे. एक शतकाच्या पुढे रेल्वे स्थानकातील भिंती टिकाव धरून असून त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्थानकांचे नवीन बांधकाम न करता स्थानकात पारंपरिक पद्धतीच्या आवश्यक दुरुस्ती करून स्थानकाचे जुने रूप कायम करण्यात आले आहे. रेल्वेस्थानकाबाहेरील परिसरातील रस्ते नवीन तयार करण्यात आले आहे. रेल्वेस्थानक परिसरात प्रवााशांना वाहने लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. रिक्षा वाहतुकीसाठी स्वतंत्र पार्किंग तयार करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकात व बाहेरील भागात आकर्षक पथदिवे लावण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षापासून स्थानकात विविध सुधारणा कामे सुरू असून २०१८ पर्यत लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. दोंडाईचा येथे विविध साहित्य उतरविण्यात येत होता, मात्र रेल्वे प्रशासनाने नंदूरबार रेल्वे स्थानकात माल उतरविण्यासाठी रॅकसाठी नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून त्यासाठी स्थानकांत याआधी सात लोहमार्ग होते,आता दोन लोहमार्ग टाकण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे मालवाहतूक गाड्यांमधील माल उतरण्यासाठी उपयोग होणार असून त्याामुळे जिल्ह्यातील उद्याेग व्यवसायाला गती मिळणार आहे. रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पादचारी पुलाची नवीन उभारणी करण्यासाठी सी.आर.एस कडून मान्यता मिळाली असून जुना पादचारी पूल काढण्यात येऊन नवीन पादचारी पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.

रेल्वेस्टेशन प्रवेशद्वारासमोरील दर्शनी वास्तूमध्ये आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून प्रवेशद्वारासमोर कारंजे लावण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकाच्या परिसरात गवताचे लाॅन टाकून आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे. रेल्वेस्थानक परिसरातील तिरंगा ध्वजाजवळील भागाला आकर्षक स्वरूप मिळावे यासाठी भिंतीवर नंदूरबार जिल्ह्याची सांस्कृतिक चित्रकृती रेखाटण्यात आली असून त्यामुळे चांगला देखावा तयार झाल्याने प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. रेल्वेस्थानकात सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्षाचे नूतनीकरण व रंगरंगोटी करून विधिध सोयीसुविधा अद्ययावत करून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच आरक्षण व तिकीट काऊंटरवर दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रवाशांसाठी नंदूरबार रेल्वेस्थानक विविध सोयीसुविधायुक्त पूर्ण तयार झाले आहे. रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटल्याने प्रवाशांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.