शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिकेत आता सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:54 IST

मंगळवारच्या घटनेनंतर घेतला निर्णय : 15 पेक्षा अधीक कॅमेरे बसविणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : मंगळवारी पालिकेत झालेल्या राडय़ानंतर आता संपुर्ण इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. साधारणत: 15 कॅमेरे बसविले जाणार आहेत. पालिकेची सध्याची इमारत ही पूर्वीच्या जेपीएन रुग्णालयाची इमारत आहे. नवीन इमारत आकारास येत नाही तोर्पयत पालिकेचे कामकाज येथूनच सुरू राहणार आहे.पालिकेच्या पूर्वीच्या इमारतीच्या जागेवर टोलेजंग व्यापारी संकुल निर्माण झाले आहे. यापूर्वी पालिका इमारतीला मिळालेली जागा ही वादाच्या भोव:यात सापडल्याने तुर्तास पालिकेचे कामकाज हे पालिकेच्याच पूर्वीच्या जेपीएन रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.सव्र्हेक्षण करण्याचा सुचनासध्याच्या पालिका इमारतीत कुठे सीसीटीव्ही कॅमेर बसवावे याबाबतचे सव्र्हेक्षण करण्याच्या सुचना तडकाफडकी देण्यात आल्या आहेत. पालिकेचे मुख्य दोन प्रवेशद्वार, दोन्ही पॅसेज, दोन्ही जिना, अध्यक्षा, मुख्याधिकारी व सभागृह आणि काही मुख्य विभागात हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात हे काम पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा निधी हा पालिका फंडातून खर्च केला जाणार आहे.कालच्या प्रकारानंतर जागमंगळवारी पालिकेत बाहेरच्या लोकांनी येवून जो राडा केला त्यामुळे पालिकेला आता जाग आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे राहिले असते तर बाहेरच्या कुठल्या लोकांनी येवून पालिकेत राडा केला हे कळाले असते. पोलिसांनाही अशा लोकांची नावे निष्पन्न करण्यास मदत झाली असती. परंतु पालिका आवारात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे संबधीत संशयीतांना शोधण्यात अडचणी येणार आहेत.कर्मचा:यांवरही नजरया निर्णयामुळे पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही पालिका प्रशासनाला नजर ठेवण्यास सोयीचे ठरणार आहे. इमारतीच्या वेगवेगळ्या भागात काही विभाग विखुरले गेले असल्यामुळे कोण कर्मचारी केंव्हा येतो, कधी जातो याची माहिती नसते. त्यामुळे नियंत्रण ठेवणेही अधिका:यांना काही प्रमाणात जिकरीचे जाते. सीसीटीव्ही कॅमे:यामुळे आता ते सोयीचे ठरणार आहे.इमारत जुनी व आकार कमीपालिकेचा वाढता विस्तार आणि वाढते कामकाज लक्षात घेता सध्याची इमारत ही तोकडी ठरत आहे. अनेक विभागातील कर्मचा:यांना अगदी दाटीवाटीने बसावे लागते. महत्वाची कागदपत्रे, अभिलेख यांना ठेवण्यासाठी देखील पुरेशी जागा नसल्याचे चित्र आहे. बैठक घेण्यास देखील मोठा हॉल नसल्याची      स्थिती आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या कॅबीनमध्येच बैठक घ्यावी लागत असते.शहरात केवळ 30 कॅमेरेनंदुरबार शहरात सद्य स्थितीत सार्वजनिक ठिकाणी केवळ 30 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या सर्व कॅमे:यांचे नियंत्रण हे पोलिस विभागामार्फत शहरातील टिळक रस्त्यावरील फडके पोलीस चौकीत केले जाते. याशिवाय काही मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, कार्यालये, बँका व धार्मिक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्यांचा चांगला उपयोग होत असतो. पोलिसांतर्फे सार्वजनिक ठिकाणी आणखी किमान 100 सीसीटीव्ही   कॅमेरे लावण्याची मागणी आहे. त्यादृष्टीकोणातून जिल्हा नियोजन व विकास समितीकडे निधीचीही   मागणी करण्यात आलेली आहे.