शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

नंदुरबारातील पालिकांच्या रणधुमाळीत तब्बल 100 अर्ज ठरले अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका निवडणुकीत दाखल अर्जाच्या छाननीत एकुण 100 अर्ज अवैध ठरविण्यात आले. आता 138 अर्ज वैध राहिले असून 30 तारखेर्पयत कितीजण माघार घेतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. दरम्यान, तीन हरकतींवर सुनावणी होऊन त्या निकाली काढण्यात आल्या. छाननीच्या वेळी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीत दाखल अर्जाच्या छाननीत एकुण 100 अर्ज अवैध ठरविण्यात आले. आता 138 अर्ज वैध राहिले असून 30 तारखेर्पयत कितीजण माघार घेतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. दरम्यान, तीन हरकतींवर सुनावणी होऊन त्या निकाली काढण्यात आल्या. छाननीच्या वेळी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. निवडणूक अधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता छाननीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी निमा आरोरा, राहुल शिंदे, गणेश गिरी, गवते आदी उपस्थित होते. प्रभागनिहाय संबधित उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून अर्ज निकाली काढण्यात येत होते. जे अर्ज अवैध ठरविले जात होते ते का अवैध ठरविले याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत होते. त्यात संबधितांचे समाधान झाले नाही तर ते वकिलांमार्फत आपली बाजू मांडत होते. सायंकाळी पाच वाजेर्पयत गर्दी कायम होती.प्रभागनिहाय अवैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे : प्रभाग एक अ- इंद्रजीत सुरेश गावीत व सुरजितसिंग इंद्रसिंग वसावे. ब- साधना हेंमत जाधव व दिपमाला राजेश मेटकर. प्रभाग 2 अ- विद्या राजेंद्र शिंदे, कोमल निखिल तांबोळी व विद्या काशिनाथ पाटील. ब- मोहन सेवकराम खानवाणी, आशिष विजयकुमार हासाणी. प्रभाग 3 अ- विद्या काशिनाथ पाटील. ब- तिजेंद्र नवलराव पाटील. प्रभाग 4 अ- सुनिता ओंकार बागुल, स्वाती भुपेंद्र ठाकरे. ब- विकास अशोक पवार, विवेक कैलास ठाकुर, रुद्रप्रताप पुष्पेंद्र रघुवंशी. प्रभाग 5 अ- राम चंद्रकांत रघुवंशी. ब- नंदा सुरेश जाधव, सपना राजेंद्रकुमार अग्रवाल, विद्या काशिनाथ पाटील. प्रभाग 6 अ- शिवाजी राजाराम येडगे. ब- अश्विनी गोविंद अग्रवाल. प्रभाग 7 अ- विजय कचरू अहिरे, दगडू फकिरा अजिंठे, लिला रमण साळवे, हिरामण सुनील साळवे, राजेश जगन्नाथ बैसाणे व संतोष भिका अहिरे. ब- गायत्री किरण सैंदाणे, वैशाली विनोद मराठे. प्रभाग 8 ब- पुजा अमित रघुवंशी, कल्पना केतनसिंग परदेशी. प्रभाग 9 अ- अतुलकुमार जयवंत पाडवी, शितल कुणाल वसावे. ब- सुषमा संदीप चौधरी. प्रभाग 10 अ- स्मिता दिपक दिघे, जयराम हिरालाल मराठे. ब- भाग्यश्री सुधाकर मराठे. प्रभाग 11 अ- कोमल निखील तांबोळी. ब- रविशंकर सोहनलाल शर्मा, जसाऊद्दीन सलीम लोहार. प्रभाग 12 अ- निशान अंजूम रंगरेज. ब- शेख अब्दुल मतीन अब्दुलगफ्फार, रोशनबी जियाउद्दीन शेख, फैजानोद्दीन मतीनोद्दीन शेख, सैय्यद मोहसिन अली नासीर अली, शेख वसीम रहिम, कुरेशी सिकंदरखान हाजी जहीरखान, शेख बहाओद्दीन सलिमोद्दीन. प्रभाग 13 अ- सुशिला राजेंद्र माळी, विद्या अनिल तेजी व शारदा अजरून तेजी. ब-सुशिला राजेंद्र माळी, विद्या अनिल तेजी, शारदा अजरून तेजी. प्रभाग 14 अ- कविता निंबा माळी, रेखा निलेश माळी, शकुंतला मोहन माळी. ब- विशाल मोहन गायकवाड, निंबा मोहन माळी, विजय यादव माळी, लक्ष्मण दशरथ माळी, निलेश श्रीराम माळी. प्रभाग 15 अ- शाह अब्दुल लतीफ सिकंदर, कुरेशी मो.इकबाल शे. सुलेमान, शाह रफिक सिकंदर, काकर ईमरान मोहम्मद, खाटीक शेख शोएब शेख आसिफ. ब- काझी फौजियाबेगम हबीबोद्दीन, इनामदार इशरतबी अमीनन्नुला, शेख हिफाजत बेगम अहेमद, शाह नजबुन्नीसा शकील, सैय्यद हसरतबी बदियोद्दीन, सैय्यद शाहीस्ताबी रफअत हुसेन. प्रभाग 16 अ- वैशाली संदीप सूर्यवंशी, संदीप दिलीप सूर्यवंशी, सुनंदाबेन रमाकांत सोनार, संदीप सुदाम चौधरी, प्रवीण मक्कन चौधरी. ब- रेखा प्रवीण चौधरी, सुनंदा रमाकांत सोनार, सुषमा संदीप चौधरी. प्रभाग 17 ब- प्रकाश भिक्कन चौधरी, ईस्माईल शाहरूखशहा फकीर, नलिनी संजय चौधरी, वंदना रवींद्र चौधरी, गजेंद्र अशोक चौधरी. प्रभाग 18 अ- विजया प्रमोद शेवाळे, संगिता सुरेश साळवे. ब- वैशाली हिरालाल चौधरी, प्रकाश मक्कनराव चौधरी. प्रभाग 19 अ- विद्या कुंदन सोनवणे, सोनल राकेश पाटील. ब- वैष्णवी मोहितसिंग राजपूत, नंदनी अविनाश माळी, वंदनाबाई कैलास पाटील, रेखा सुरेश माळी, सुवर्णा शरद पाटील यांचा समावेश आहे. ब- अविनाश महादू माळी, मोहितसिंग अशोक राजपूत, कुंदन सोनवणे, भरत खंडू चौधरी यांचा समावेश आहे.दरम्यान, छाननीच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व समर्थक यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त तैणात केला होता. सायंकाळर्पयत ही गर्दी कायम होती. त्यामुळे या भागाला यात्रेचे स्वरूप आले होते.