शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे नंदुरबारातील प्रवाशांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:43 IST

गैरसोय : नंदुरबार एसटी आगारातून आजपासून जादा गाडय़ा सोडण्याचे नियोजन

ठळक मुद्देएसटीचे जादा फे:यांचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वेने गुरूवारपासून पॅसेंजर गाडय़ा रद्द केल्याने प्रवाशी बसेसचा आधार घेत आहेत़ यात वेळेवर बसेस मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून प्रवासात अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आह़े भुसावळ-सुरत रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम रेल्वे व पाळधीदरम्यान मेगा ब्लॉक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आह़े यानुसार गुरूवारी दुपारी दोन्ही पॅसेंजर गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाल़े पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए़क़ेगुप्ता तसेच मुंबई मंडळाचे रेल्वे प्रबंधक मुकूल जैन यांनी नुकताच रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला होता़ यानुसार शिल्लक असलेले दुहेरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ मिळालेल्या आदेशानुसार रेल्वे अधिका:यांनी विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यास घेतले असून यासाठी मेगा-ब्लॉक होणार आह़े यानुसार 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर, 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर 16 ते 21 नोव्हेंबर रद्द करण्यात आली आह़े तसेच 19025 सुरत-अमरावती पॅसेंजर 19 नोव्हेंबर रोजी तर 19026 अमरावती सुरत पॅसेंजर 20 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली़ 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत सुरत-भुसावळ पॅसेंजर केवळ नंदुरबार्पयतच धावणार आह़े सुरतहून दररोज रात्री 11़30 वाजता भुसावळकडे रवाना होणा:या रेल्वेगाडय़ा रद्द झाल्याने पश्चिम रेल्वेने अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, ओखापुरी एक्सप्रेस, अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस या गाडय़ांना 16 ते 21 दरम्यान धरणगाव, अमळनेर, व्यारा आणि बारडोली या स्थानकांवर थांबा देण्यात आला आह़े पॅसेंजर गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत असून गुजरात राज्यात जाणारे व येणा:या प्रवाशांना बसेस आणि खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आह़े