शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पंचायत समितीत सेस फंडावरुन आजी-माजी सभापतींमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सेस फंडाचा निधी  वळविताना भेदभाव होत असल्याच्या वादातून पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी प्रचंड गदारोळ झाला़ विद्यमान सभापती रंजना नाईक व माजी सभापती अर्चना गावीत यांच्या शाब्दिक चकमक झाली़पंचायत समितीची सर्वसाधारण सभा बुधवारी सभापती रंजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर उपसभापती ज्योती पाटील,  गटविकास अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सेस फंडाचा निधी  वळविताना भेदभाव होत असल्याच्या वादातून पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी प्रचंड गदारोळ झाला़ विद्यमान सभापती रंजना नाईक व माजी सभापती अर्चना गावीत यांच्या शाब्दिक चकमक झाली़पंचायत समितीची सर्वसाधारण सभा बुधवारी सभापती रंजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर उपसभापती ज्योती पाटील,  गटविकास अधिकारी उदय  कुसुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पोतदार, ग्रामपंचायत विभागाचे अनिल बि:हाडे आदी उपस्थित होते. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर असलेल्या विषय क्रमांक 6 वरील  बांधकाम विभागाने प्रस्तावित केल्याप्रमाणे सेसअंतर्गत कामांना मंजुरी देण्याच्या विषय समोर आला़ तेव्हा विरोधी सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. याविषयावरून सुमारे अर्धा तास गदारोळ चालला.  गदारोळात सभापती रंजना नाईक व माजी सभापती अर्चना गावीत यांचात शाब्दिक चकमकी झडल्या..तर जिल्हाधिका:यांकडे तक्रार करणार विकास कामे करीत असताना सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव करू नये अन्यथा आपण जिल्हाधिका:यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे अर्चना गावीत यांनी सभागृहात  सांगितले. या विषयावरून सभागृहात तब्बल अर्धा तास गदारोळ चालला.  विकास कामांमध्ये कोणावरही अन्याय होऊ नये असे सदस्य रीना गिरासे व  तुषार धामणे यांनी मागणी केली. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावातील आदिवासी मुलांची आश्रमशाळा दुसरीकडे हलविण्यात आलेली आहे त्या ठिकाणी विद्याथ्र्याना सोयीसुविधा व्यवस्थित मिळतात काय ? असा प्रश्न सदस्य देवमन चौरे यांनी करीत त्याठिकाणी पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचे सांगितले. त्यावर आदिवासी विकास विभागाचे डी. डी. नवटे यांनी सांगितले की, संबंधित आश्रमशाळेत सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून पाण्याची व्यवस्था पुरेशी आहे. अगर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेत खातेनिहाय विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली़