शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात यंदाही ‘निवडक’ शाळांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:50 IST

आरटीई : पालकांमध्ये प्रवेशाबाबत उत्सूकता, शिक्षण विभागाचा जनजागृतीवर भर

नंदुरबार : २५ फेब्रुवारीपासून पालकांना ‘आरटीई’अंतर्गत आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे़ परंतु मागील काही वर्षांचा अनुभव बघता यंदाही पालकांकडून काही ‘निवडक’ शाळांनाच पसंती मिळणार की काय? असे चित्र आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे़२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया २०१९-२०२० ला सुरुवात झाली आहे़ ८ फेब्रुवारीपासून आरटीईअंतर्गत शाळांचे रजिस्ट्रेशन तसेच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे़ याची अंतीम मुदत २२ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेली आहे़ तर पालकांना प्रत्यक्षात आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे़ त्यामुळे पालकांमध्ये आॅनलाईन शाळा प्रवेशाबाबत कमालीची उत्सूकता दिसून येत आहे़ मात्र बहुतेक पालकांकडून २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची निवड करताना निवडक शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे़ त्यामुळे इतर शाळांकडे आरटीईअंतर्गत जागा रिक्त राहत असल्याचे सांगण्यात येत आहे़२५ टक्के प्रवेश प्रक्रिया पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरअंतर्गत चालविण्यात येत आहे़ गेल्यावर्षी जिल्ह्यातील ४७९ जागांसाठी ५७९ आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते़ परंतु अ‍ॅडमिशन घेण्यासाठी पालकांकडून नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील ठराविक शाळांनाच प्राधान्य देण्यात आले होते़ २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रकिया जिल्ह्यातील ४३ शाळांमध्ये सुरु असतानासुध्दा पालकांकडून केवळ ३ ते ४ शाळांनाच प्राधान्य देण्यात येत असते़ त्यामुळे इतर शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत घरघर असल्याचे दिसून येत आहे़ वर्षानुवर्षे अशा प्रकारे आरटीईअंतर्गत जागा रिक्त राहत असल्याने यामुळे पालक वर्गाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़मागील वर्षी केवळ १३७ विद्यार्थ्यांचेच प्रवेशदरम्यान, आरटीई प्रवेश प्रकियेअंतर्गत मागील वर्षी तीन प्रवेश फेऱ्या झाल्या होत्या़ याअंतर्गत केवळ १३७ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले होते़ तर तब्बल ३४२ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळाली़ रिक्त जागांमुळे शिक्षण विभागाला चौथी प्रवेश फेरी घेण्याबाबत कार्यवाही करावी लागली होती़तर दुसरीकडे, सीबीएसई व इतर शाळा उघडून बरेच दिवस झाल्यावरही आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरुच होती़ त्यामुळे आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली होती़तांत्रिक अडचणींची समस्याआरटीईअंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतची कार्यवाही पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरकडून होत असते़ अनेक वेळा आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणींअभावी व्यत्यय निर्माण होत असतो़ ही परिस्थती केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर राज्यभरात सारखीच असल्याचे सांगण्यात आले़