शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार, नवापूरात 14 तास वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 10:53 IST

मुसळधार पावसाचा परिणाम : दुरूस्तीसाठी धुळे व चाळीसगाव येथून मागवावे लागले पथक

ठळक मुद्दे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस अनेक दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व विसरवाडी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तर नवापूर मंडळात 60 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. नंदुरबा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उर्जा मंत्र्यांच्या आगमनाच्या आधीच वीज कंपनीने आपला कारभार चव्हाटय़ावर आणला आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात तब्बल 14 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरासह निम्मे तालुका आणि संपुर्ण नवापूर तालुका अंधारात होता. त्यामुळे नंदुरबार आणि नवापूर शहरातील पाणी पुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला होता.वीज वितरण कंपनीने पावसाळ्याआधी सर्वच संकटांना तोंड देण्यास कंपनी सज्ज असल्याचे सांगितले होते. तसे नियोजन देखील करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु वीज कंपनीच्या सुदैवाने यंदा ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात वादळी पाऊस झालाच नव्हता. शनिवारी रात्री मात्र वादळी पाऊस झाल्याने वीज कंपनीचे वाभाडे निघाले. शनिवारी सांयकाळी सात वाजेपासून ढगांच्या गडगडाटात अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस सुरू होता. याच दरम्यान वावद ते उमर्दे दरम्यान टॉवर लाईनवर वीज पडल्याने आणि मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अशा वेळी पर्यायी यंत्रणा असणे आवश्यक असतांना वीज कंपनीकडे तसे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात अंधार होता. रात्री आठ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रविवारी सकाळी 10 वाजता सुरळीत झाला. बिघाड दुरूस्त करणे आणि तुटलेल्या तारा तातडीने जोडण्यासाठी धुळे येथील पथकाला बोलविण्यात आले होते. या पथकाने पहाटे कामाला सुरुवात करून सकाळी 10 वाजेर्पयत काम पुर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला. ज्या ठिकाणी बिघाड झाला होता त्याच ठिकाणच्या शेतात पाणी होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठय़ा अडचणी येत होत्या. त्यामुळे पहाटे कामाला सुरुवात करण्यात आली.नवापूर तालुकाही अंधारातनंदुरबार शहरासह तालुक्यातील काही भाग अंधारात होता. त्याचप्रमाणे नवापूर शहर व संपुर्ण तालुका देखील अंधारात होता. रात्री आठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेअकरा वाजेर्पयत नवापूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.  पाणी पुरवठय़ावर परिणामतब्बल 14 ते 15 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नंदुरबारसह नवापूर शहरातील आणि अनेक गावांमधील पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला होता. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या झराळी फिडरवर देखील वीज पुरवठा नसल्यामुळे तेथून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शहरातील जलकुंभ भरण्यावर झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागली.काही भागात सुरळीतनंदुरबारातील काही भागात नेहरूनगर उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना ब:यापैकी दिलासा मिळाला होता. असे असले तरी अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच होते.