शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार, नवापूरात भुकंपाचे सौम्य धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 19:17 IST

भरूच येथे केंद्र : 4.6 तीव्रतेची नोंद, काळंबा येथे घराला तडे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : जिल्ह्यातील गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी भुकंपाचे हलके धक्के जाणवले. भुकंपाचा केंद्र भरूच येथे होते. तेथे 4.6 रिक्टर स्केलची नोंद करण्यात आली. दरम्यान, भुकंपामुळे कुठेही जिवीत किंवा वित्त हाणी झाली नाही. जिल्ह्यात त्याची तीव्रता सौम्य असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली.शनिवारी सायंकाळी नवापूर, नंदुरबार शहरासह गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक भागात भुकंपाचे धक्के जावणले. नंदुरबार व परिसरात 4 वाजून 52 ते 56 मिनिटांदरम्यान हे धक्के जाणवले. नवापूर तालुक्यातील काळंबा गावातील अविनाश बि:हाडे यांच्या घराच्या भिंतीला या भुकंपामुळे तडा गेल्याचे सांगण्यात आले. भुकंपाच्या धक्याची जाणीव होताच अनेकांनी एकमेकांना विचारणा केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा अनेकांनी प्रय} केला.भुकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील भरूच येथे असल्याचे गांधीनगर येथील भुकंप नोंद केंद्रातर्फे सांगण्यात आले. तेथे 4.6 रिक्टर स्केलची नोंद करण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत एकुण नऊ ठिकाणी भुकंप नोंदणी केंद्र आहे. त्यात सावळदा, ता.शहादा येथेही केंद्र आहे. पूर्वी तेथे नोंदी घेतल्या जात होत्या. आता सर्व नऊ केंद्राच्या नोंदी या गांधीनगर येथे घेतल्या जातात. दरम्यान, जिल्ह्यात भुकंपाची तीव्रता फारशी नव्हती. केवळ सौम्य धक्के जाणवले. नंदुरबार, नवापूरसह सर्व तहसीलदारांना याबाबत माहिती घेण्याचे सुचीत करण्यात आले आहे. कुठलीही जिवीत किंवा वित्त हाणी झालेली नाही. नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले.